krushikranti.com
09-01-19


फुलशेती - एस्टर लागवड.


जमीन - मध्यम सुपीक, पोयट्याची, पाण्याचा निचरा होणारी.

हवामान - समशीतोष्ण, १० सेल्सियस ते ३५ सेल्सियस तापमान.

लागवड कालावधी - जून - जुलै, ऑक्टोबर - नोव्हेंबर.

पूर्व मशागत - खोल नांगरणी, वखरणी.

लागवड पद्धत - सरी वरंबा पद्धतीने, दोन ओळीतील अंतर ३० सेमी दोन रोपातील अंतर २० सेमी.

गादीवाफ्यावर किंवा कोकोपीट मध्ये रोपे तयार करून घ्यावी.

बियाणे निवड - फुले गणेश व्हायोलेट, पिंक, व्हाईट, पर्पल. एकरी २०० ग्रॅम बियाणे.

खते - एकरी १० टन शेणखत, लागवड करताना एकरी १०० किलो १६/१६/१६ मिश्रखत.

पाणी व्यवस्थापन - दर आठवड्याला पाणी पाळी, खरीपात पावसाने ताण दिला तरच.

रोग /किडी - शक्यतो रोग किडी कमी येतात. करपा आल्यास कॉपर ओक्सिक्लोराइड फवारावे, मर रोगासाठी जमिनीतून थायमेट द्यावे.

काढणी - रोप लागवडी नंतर तीन महिन्यांनी तोडणी सुरु करावी. उत्पादन एकरी सुमारे २० लाख फुले.