krushikranti.com
09-01-19


दुधी भोपळ्याच्या लागवडीसाठी मध्यम काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी.

जमिनीची योग्य मशागत करून शेणखत मिसळून द्यावे.
लागवड जून-जुलै आणि जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत करावी.
मंडप पद्धतीने 3 मीटर x 1 मीटर अंतराने लागवड करावी.
लागवडीपूर्वी मातीपरीक्षणानुसार 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे.
लागवडीनंतर एक महिन्याने 50 किलो नत्र द्यावे.
प्रतिहेक्‍टरी 2.5 किलो बियाणे लागते. लागवडीसाठी सम्राट ही जात निवडावी.