krushikranti.com
24-02-19

पंतप्रधान किसान सन्मान योजनेला आज सुरुवात

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 75000 कोटी रुपयांच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेस सुरुवात होणार

या योजनेच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात एक कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा केला जाणार, आणखी एक कोटी शेतकऱ्यांना येत्या काही दिवसात या योजनेच्या अंतर्गत निधीचा पहिला हप्ता मिळणार

पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत दोन हेक्टर किंवा त्याहून कमी लागवडयोग्य जमीन असलेल्या देशभरातील 12 कोटी शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा निधी दिला जाणार आहे.