krushikranti.com
09-01-19राजगिरा लागवडीबाबत माहिती.

राजगिरा हे पीक हरभरा आणि गव्हामध्ये मिश्रपीक म्हणून घेतले जाते. रब्बी हंगामात सलग पीक म्हणून लागवड केल्यास अधिक उत्पादन मिळू शकते.
मध्यम ते भारी प्रतीच्या जमिनीत पेरणी करावी. लागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरट करून ढेकळे फोडून भुसभुशीत करावीत. पेरणी साधारण 15 ऑक्‍टोबर ते 7 नोव्हेंबर या दरम्यान करावी. हेक्‍टरी दीड ते दोन किलो बियाणे लागते. अन्नपूर्णा, जी.ए.-1 ,सुवर्णा, फुले कार्तिकी या सुधारित जाती आहेत. बियाणे बारीक असल्याने वाळलेली माती मिसळून दीड फुटी पाभरीने (45 x 15 सें.मी. अंतरावर) एक ते दीड सें.मी. खोलीपर्यंत पेरणी करावी.
पेरणीनंतर सारे पाडून लगेच हलके पाणी द्यावे. आठ दिवसांच्या आत पिकाची विरळणी करणे अत्यंत गरजेचे आहे, त्यामुळे पिकाची वाढ व्यवस्थित होते आणि रोपांतील योग्य अंतर राखले जाते. माती परीक्षणानुसार हेक्‍टरी 60 किलो नत्र अधिक 40 किलो स्फुरद अधिक 20 किलो पालाश या रासायनिक खतांची मात्रा द्यावी