krushikranti.com
09-01-19


स्टोबेरी हे थंड हवामानात येणारे पीक आहे.स्ट्रॉबेरीची लागवड पूर्वी मर्यादित क्षेत्रावर आणि ठराविक ठिकाणीच होत असे, पण अलीकडे या पिकाची लागवड इतर ठिकाणीही होऊ लागली आहे. महारष्ट्रात स्ट्रॉबेरीच्या फळाभोवती आकर्षणाचे वलय निर्माण झाले आहे, कारण फळाचे नाविन्य, या फळातील पोषणमूल्ये आणि आपल्या देशात आणि देशाबाहेर या फळाला असलेली मागणी यामुळे भारतामध्ये नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेता येते. त्यामुळे स्ट्रॉबेरीच्या ताज्या फळांना युरोपीय देशांत निर्यातीसाठी भरपूर वाव आहे. याचा वापर आईसक्रीम,जॅम,जेली,साबण ,धूप,औषध तसेच सौंदर्य प्रसाधने मध्ये केला जातो.


जमिनीचा प्रकार

स्ट्रॉबेरीच्या उत्तम वाढीसाठी पाण्याचा उत्तम निचरा असणारी हलकी, मध्यम काळी, वालुकामय पोयटा, गाळाची जमीन असावी. जमिनीचा आम्ल-विम्ल निर्देशांक 5.5 ते 6.5 या दरम्यान योग्य असतो. भुसभुशीत - वालुकामय जमिनीत स्ट्रॉबेरीच्या रोपांची मुळे जोमाने वाढतात.


हवामान

या पीकासाठी थंड हवामान चांगले मानवते.हिवाळ्यात भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या दिवसात १० अंश ते २५ अंश से.गे तापमानात स्ट्रॉबेरिची लागवड यशस्वी होते तसेच उष्ण हवामानात २० ते २५ अंश से.गे असेल तर फुल तर फुलनिर्मिती होऊन फळधारणा दीर्घकाळ चालू राहते या साठी जास्त काळ थंडी मिळाली पाहिजे.


पिकाची जात

स्वीट चार्ली, केम्रोजा, सेल्वा, चॅन्डलर, राणीया, कॅलिफोर्निया, रजिया, विंटरडोन


लागवड

या पिकाची गादी वाफ्यावर ६० X ३० से.मी अंतरावर लागण करावी.स्ट्रॉबेरीची मुळे मातीच्या वरच्या 15 ते 20 सें.मी. पर्यंतच्या थरातच वाढतात. स्ट्रॉबेरीच्या चांगल्या वाढीसाठी मऊ आणि भुसभुशीत गादी वाफे तयार करावेत. गादी वाफ्यावर स्ट्रॉबेरीची लागवड दोन ओळी, तीन ओळी अथवा चार ओळी पद्धतीनेसुद्धा केली जाते. त्यानुसार योग्य आकाराचे तयार करावेत. दोन ओळी पद्धतीसाठी - 90 सें.मी. रुंद व 30 ते 45 सें.मी. उंची असलेल्या गादीवाफ्यावर दोन रोपांतील अंतर 30 सें.मी. व दोन ओळीतील अंतर 60 सें.मी. असावे. दोन ओळी पद्धतीत प्रति एकर 22 ते 25 हजार रोपे लागवडीसाठी लागतात.तीन ओळी पद्धतीसाठी - 120 सें.मी. रुंद व 30 ते 45 सें.मी. उंची गादी वाफे करावेत. चार ओळी पद्धतीनेही लागवड होत असली तरी आंतरमशागत, फळ तोडणी, गादीवाफ्यास प्लॅस्टिक मल्चिंग करणे या मध्ये अडचणी येत असल्याने प्रामुख्याने दोन ओळी पद्धतीने लागवड सोईस्कर ठरते.


खत व्यवस्थापन

या पिकाची लागवड करते वेळी जमिनीत कुजलेल्या शेणखताचा जास्त वापर करावा .४० ते ५० टन तसेच एकरी १५० किलो युरिया, २०० सुपर फोस्फट,१०० किलो पोटॅश द्यावे.त्यातले २०० किलो सुपर फोस्फट ५० पोटॅश आणि ५० किलो युरिया लागवडीच्या वेळी द्यावे. ५० किलो पोटॅश ४५ दिवसानी द्यावे(फुल धरणे च्या काळात ) तसेच द्रवरूप खते ठिबक सिंचन मधून द्यावीत . ठिबक सिंचन मधून दिली जाणारी खते - रोपाच्या चांगली वाढ होण्यासाठी १९:१९:१९ या विद्राव्य खताची मात्रा ठिबक द्वारे एकदिवसा आड २ ते ३ किलो द्यावे.तसेच फुल कळीच्या अवस्थेत ४० ते ४५ दिवसा नंतर ०:५२:३४ खत एक दिवसाच्या अंतर ने एकरी ३ ते ४ किलो द्यावे या मुळे उत्पादन वाढीस मदत होईल तसेच ०:५२:३४ या खताची १५ लिटर च्या पंप ला ४० ग्रॅम घेऊन फवारणी करावी या मुळे फळांचा आकार वाढीसाठी मदत होईल.


पाणी व्यवस्थापन

स्ट्रॉबेरी पिकास जास्त पाणी मानवत नाही तसेच जास्त काळ ओलावा राहिल्यास रोपाची मर व फळ कूज होते म्हणून पीकच्या आवश्यकते नुसार पाणी द्यावे तसेच पाण्याचा फुल व फळ धारणेच्या काळात ताण नाही याची काळजी घावी.रोपाची लागवड झाले कि २ ते ३ दिवस रोज पाणी द्यावे नंतर जमिनीच्या मगदूर नुसार पाणी द्यावे.


रोग नियंत्रण

पानावरील ठिपके -उपाय - रिमोन २५-३० मिली घेऊन फवारणी करणे .


रोग - ठिपके ,फळकूज -या रोग मध्ये फळाची कूज होते.


उपाय


- बाविस्टीन -४० ग्रॅम १५ लिटर च्या पंपला घेऊन फवारणी करणे.


ठिपके ,फळकूज - या रोग मध्ये फळाची कूज होते उपाय

- बाविस्टीन -४० ग्रॅम १५ लिटर च्या पंपला घेऊन फवारणी करणे.


उत्पादन

स्ट्रॉबेरी ची पक्व झालेली फळे काढून पारदर्शक प्लास्टिक च्या अथवा कोरुगेटेड बॉक्स मध्ये प्रतवारी करून पॅकिंग करावे. साधारण एका झाड पासून ४० ते ५० फळे येतात. एकरी साधारण ८ ते १२ टन उत्पादन मिळते