राज्यात 31 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता...
31-07-2024
राज्यात 31 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता…
आज दि. 31 जुलै 2024 राज्यामध्ये मागील काही दिवस रिमझिम पाऊस चालू होता परंतु दि 31 जुलै ते 5 ऑगस्ट पर्यन्त जोरात पाऊस पडणार आहे. ज्या ठिकाणी सूर्य दर्शन होतील त्या ठिकाणी हा पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी 1 तास, 30 मिनिटे असा पाऊस चालू राहणार आहे.
पूर्व विदर्भात नागपूर, वर्धा, अमरावती, अचलपुर, अकोला, बुलढाणा, जालना, वैजापुर, मालेगाव, नाशिक, नंदुरबार, धुळे, संभाजीनगर, जोटपुरी या ठिकाणी 5 तारखेपर्यंत जोरदार पाऊस पडणार.
राहिलेल्या भागामध्ये 1 तास, 30 मिनिटे अशा कालांतरामध्ये पाऊस पडणार आहे. तरी सर्व शेकऱ्यांना फवारणी करून घेण्याची विनंती कारण दि. 6 आणि 7 दरम्यान ऊन पडण्याची शक्यता आहे नंतर पुन्हा पाऊस चालू राहणार आहे.
सांगली सातारा टप्प्यातील पाऊस आता उत्तर महाराष्ट्र व पश्चिम विदर्भयमध्ये पाऊस पडणार आहे. ऑगस्ट महिन्यातील पावसामुळे शेतीमाल बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे जसे कांदा बाजारभाव.