शेतकऱ्यांसाठी १ रुपयात पीक विमा योजनेची अर्थसंकल्पात घोषणा, वर्षाला मिळणार 12 हजार रुपये
09-03-2023

शेतकऱ्यांसाठी १ रुपयात पीक विमा योजनेची अर्थसंकल्पात घोषणा, वर्षाला मिळणार 12 हजार रुपये
अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प पंचामृत ध्येयावर आधारित, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प हा अमृतकाळातील पहिलाच अर्थसंकल्प असून तो पंचामृत ध्येयावर आधारित असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळणार असून शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजनेचाही लाभ घेता येणार आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना आता एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे. उर्वरित रक्कम राज्य सरकारकडून भरण्यात येणार आहे.
अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प पंचामृत ध्येयावर आधारित
- शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी
- महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास
- भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास
- रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा
- पर्यावरणपूरक विकास
अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष. या महोत्सवासाठी 350 कोटी रुपये
- आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान: 50 कोटी
- मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने : 250 कोटी रुपये
- शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय. शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन : 300 कोटी रुपये
- केंद्र सरकारच्या किसान सन्मान योजना या योजनेत आणखी सहा हजार रुपयांची भर केंद्र सरकार घालणार. त्यामुळे शतकऱ्यांना वर्षाकाठी 12 हजार मिळणार
- प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर
- नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
- प्रतिशेतकरी, प्रतिवर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार
- केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार
- 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ
- 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार
source : abp live