जनावर गाभण न राहण्याच्या समस्येवर घरगुती उपचार
07-11-2022

जनावर गाभण न राहण्याच्या समस्येवर घरगुती उपचार
गायी, म्हशींमध्ये तीनदा योग्य वेळी रेतन केल्यानंतरही जर जनावर गाभण राहत नसेल, तर यास वारंवार उलटणे असे म्हणतात. गायी म्हशीमध्ये माजाचे चक्र दर २१ दिवसांनी येत असते. जिथे जास्त दूध उत्पादन, तिथे वारंवार उलटण्याचे प्रमाण जास्त दिसून आलेले आहे. त्यामुळे दुधाळ गायी- म्हशींमध्ये वारंवार उलटण्याची समस्या जास्त प्रमाणात दिसून येते.
वारंवार उलटण्याची अनेक कारणे आहेत परंतु फलनातील दोष आणि भ्रूण दोष ही मुख्य कारणे आहेत. रेतन केल्यानंतर फलनाची क्रिया योग्य झालेली असल्यास, २१ दिवसांनी पुन्हा माज दिसून येत नाही. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने जनावर गाभण नराहण्याच्या समस्येवर नैसर्गिक घरगुती उपचारांची शिफारस केली आहे.
खाली दिलेले पदार्थ क्रमवार दिवसातून एकदा गुळ आणि मिठासोबत खाऊ घालावे.
- एक मुळा दररोज पाच दिवस
- कोरफडीचे एक पान दररोज असे चार दिवस
- चार मुळी हडजोड चार दिवस
- चार मुठी कडीपत्ता व हळद चार दिवस
- लक्षात ठेवा हा उपचार माजाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवसापासून करावा.
टीप : अशाप्रकारे शेतीविषयक महत्त्वाची माहिती, हवामान अंदाज तसेच दररोजचे ताजे बाजारभाव आपल्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी तुमच्या जिल्ह्याच्या whatsapp ग्रुपला जोडले जा ➡ येथे क्लिक करा
source : agrowon