कांदा लागवडीपासुन काढणीपर्यंत माहिती

26-05-2023

कांदा लागवडीपासुन काढणीपर्यंत माहिती

कांदा लागवडीपासुन काढणीपर्यंत माहिती

कांदा लागवड प्रामुख्याने खरीप आणि रब्बी अशा दोन हंगामांत केली जाते. खरीप हंगामासाठी मे जून महिन्यांत रोपे तयार करून त्यांची पुनर्लागवड जून-जुलै महिन्यांत करतात. जुलै ऑगस्ट ह्या काळात तापमान २० ते २५ अंश सेल्सिअस असते, त्यामुळे कांदा तयार होण्यास मदत होते. सप्टेंबर-ऑक्टोबर या काळात दिवसाचे उष्ण तापमान आणि रात्रीत भरपूर पाऊस यामुळे करपा या रोगाचा कांद्यावर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. तसेच फुलकिड्यांचाही उपद्रव वाढतो.

काढणीच्यावेळी पाऊस झाल्यास कांद्याची काढणी करणे, तो पातीसह सुकविणे, पात कापणे ही कामे करणे कठीण होते. या हंगामातील कांद्याला काढणीनंतर लगेचच कोंब येतात. या सर्व बाबींमुळे खरीप कांद्याची साठवण करता येत नाही. त्यामुळे खरीपातील कांदा लगेच विक्रीसाठी काढावा लागतो.

खरीप हंगामातील कांद्याला पोळ कांदा असे म्हणतात तर रब्बी हंगामातील कांद्याला रांगडा कांदा असे म्हणतात.

रोपे तयार करणे : 

  • १ हेक्टर कांदा लागवडीसाठी अंदाजे १० गुंठे जमिनीत रोपांसाठी बी टाकावे. ह्या जमिनीत दोनशे किलो घन जीवामृत टाकावे.
  • शक्य झाल्यास जिवामृत बेडवर शिंपडावे पेरणीसाठी ३ मी. x १ मी. आकाराचे गादीवाफे करावे व बियाण्याला बिजसंस्कार करून पेरणी ओळीमध्ये ५ सेंमी. अंतरावर व २ सेंमी खोल करावी. 
  • गादी वाफ्याचा सरीमधे धने, मेथी, गाजर, शेपू, पालक बियाणे फार दाट पेरू नये. म्हणजे रोपांची वाढ सारखी होऊन नर्सरीची देखभाल सुलभतेने करता येते.

लागवड पद्धती : 

  • निरनिराळ्या भागांत कांद्याची लागवड वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. काही भागांत बी शेतात कायम जागी पेरून लागवड करतात, तर अनेक ठिकाणी गादीवाफ्यांवर रोपे तयार करून नंतर त्यांची पुनर्लागवड करतात. 
  • रोपांची पुनर्लागवड सपाट वाफ्यात किंवा सरी वरंब्यावर करतात. काही भागांत रोपांची पात कापून लागवड करतात, तर काही भागांत पात न कापता लागवड करतात.
  • एका रोपापासून एकच कांदा मिळतो. त्यामुळे रोपांची संख्या योग्य प्रमाणावर राखणे उत्पादन वाढीच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. 
  • खरीप हंगामात रोपे १५ x २० सेंटिमीटर अंतरावर आणि रब्बी किंवा उन्हाळी हंगामात रोपे १२ x १० सेंमी अंतरावर लावावीत.

सरी :

  • वरंब्यावर लागवड करावयाची झाल्यास ३० सेंमी रुंदीची सरी पाडून सरीच्या दोन्ही बाजूंवर १० सेंमी अंतरावर एकाच ओळीत रोपे लावावीत.
  •  गादीवाफे ६० सेंमी रूंदीचे करावेत. १० x ७.५ सेंमी अंतरावर लागवड करावी. 
  • लागवडीसाठी शक्यत रोपांचा खालील भाग फुगीर झालेल्या अशा रोपांची निवड करावी. लहान रोपांची लागवड केल्यास नांगे मोठ्या प्रमाणात पडतात.
  • त्यामुळे उत्पादनात घट येते. अशावेळी आंबवणी देताना नांगे साधून घ्यावे. रोपे लागवडीच्या अगोदर पांढऱ्या मुळ्या बिजामतच्या पाण्यात द्रावण तयार करून त्यामध्ये रोपांची मुळे बुडवून लागवड करावी.

साफळा पिके : 

  • नैसर्गिक पद्धतीने कांदा लागवड करतांना साफळापिके मुख्य भुमिका बजावतात.
  • मित्र कीटकांची संख्या वाढवण्याची जबाबदारी पार पाडतात साफळा पिकावर रोग व कीड आपले गुजरान करतात परीणामी मुख्य पिकावर रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी जाणवतो कमी अधिक प्रमाणात रोग व कीड आल्यास आर्थिक नुकसानाची पातळी गाठत नाही. त्यामुळे रोग व कीडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सापळा पिके लागवड करणे अत्यंत महत्वाचे आहे यासाठी. 
  • कांदा पिकाच्या चारही धुऱ्याने एकाच जागी मका व चवळी एकत्र करून यांची लागवड करून संरक्षण भिंतीसाराखी लागवड करावी. कांद्यामध्ये दोन ओळीमध्ये ज्या ठीकाणी जागा रीकामी असेल तेथे धने, मेथी, पालक, शेपू असे कमी उंचीची व मुख्य पिकाला अडचण निर्माण होणार नाही असे ठीक ठिकाणी बिजामृत संस्कार टोकण करुन लागवड करावी.
  • पुढे साफळा पिके मुळासकट काढणी करु नये. वरच्यावर खुडुन काढणी करावी. कारण यांच्या मुळांवर मोठया प्रमाणात नत्र स्थिर करणाऱ्या जीवानुंच्या गाठी असतातं. व ते पुढे मुख्य पिकास नत्र पुरवठा करतात.

नैसर्गीक खते : 

  • वाढलेला दर सापडावा म्हणून, कांदा लवकर वाढावा व पोसावा म्हणून कांदा लागवड करतांना एकरी चारशे किलोघन जीवामृत जमीनीत टाकावे. दुसऱ्या व तिसऱ्या महीन्यात जमीनीत ओलावा असतांना शक्य झाल्यास दोनशे किलो घन जीवामृत प्रतिएकरी पुन्हा फोकून द्यावे.
  • जीवामृतचा वापर प्रती एकरी दोनशे लीटर पंधरा दिवसात एकदा याप्रमाणे वापर सुरू ठेवावा. अप्रतीम असे फायदे पाहवयास मिळतात.

 पाणी :               

  1. भारी जमिनीत १० ते १ २दिवसांचे अंतराने,
  2. तर रब्बी,उन्हाळ्यामध्ये ७ ते ८ दिवसाचे अंतराने पाणी द्यावे.

महत्त्वाचा रोग आणि त्याचे नियंत्रण :

करपा रोग (अल्टरनेरिया ब्लाईट) :

या बुरशीजन्य रोगाचे प्रमाण उष्ण आणि दमट हवामानात म्हणजे खरीप हंगामात जास्त प्रमाणात दिसून येते. खरीप हंगामातील ढगाळ हवामानात आणि पाऊस यामुळे करपा रोगाचा प्रसार ६० ते ६५ टक्क्यांपर्यंत होतो, तर रब्बी हंगामात या रोगाचा प्रसार ३८ टक्क्यांपर्यंत होतो.

बुरशीचा प्रादुर्भाव झालेल्या कांद्याच्या पातीवर सुरुवातीला खोलगट पांढुरके चट्टे पडतात. चट्ट्यांचा मध्यभाग जांभळट रंगाचा असतो. चट्टे पडण्याची सुरुवात शेंड्याकडून होते. चट्ट्यांचे प्रमाण वाढल्यामुळे पाने शेंड्याकडून वाळू लागतात आणि संपूर्ण पात जळाल्यासारखी दिसते आणि शेवटी सुकून गळून पडते.

हा रोग रोपाच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळात आल्यास पात जळून गेल्यामुळे पिकाची वाढ चांगली होत नाही. कांदा पोसत नाही आणि चिंगळी कांद्याने प्रमाण वाढते. कांदे पोसण्याच्या काळात रोग आल्यास बुरशीचा प्रादुर्भाव कांद्यापर्यंत होतो आणि कांदा सडतो. कांद्याची निरोगी जोमदार वाढ होण्यासाठी पात रसरशीत हिरवीगार राहून कांद्याचे चांगले पोषण होण्यासाठी खालीलप्रमाणे फवारणी करावी.

१) पहिली फवारणी : 

(लागवडीनंतर १० ते १५ दिवसांनी ५ लीटर वस्त्रगाळ केलेले जीवामृत + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी :

(लागवडीनंतर ३० ते ४० दिवसांनी) : १० लीटर वस्त्र गाळ केलेले जीवामृत + ६ लीटर देशी गायीचे आंबट ताक १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी :

(लागवडीनंतर ५ ० ते ६० दिवसांनी) : १५ लीटर वस्त्र गाळ केलेले जीवा मृत + ८ लीटर देशी गायीचे आंबट ताक + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी :

(लागवडीनंतर ७५ ते ८० दिवसांनी) : २० लीटर वस्त्र गाळ केलेले जीवामृत + १० लीटर देशी गायीचे आंबट ताक + २०० ते २५० लि. पाणी.

फुलकीडे थ्रीप्स अळ्यांसाठी आपल्या शेतपरस्थितीचा अभ्यास निरक्षण करून नैसगीक किडनाशक अग्नीअस्त्र, ब्रम्हास्र, दशपणीअर्कचा वापर करावा.

काढणी, उत्पादन आणि विक्री :

कांद्याची काढणी केल्यानंतर त्याची प्रतवारी करणे, कांदा सुकविणे, पात कापणे, बाजारभाव मिळेपर्यंत कांद्याची तात्पुरती साठवण करणे या गोष्टींकडे अनेकदा नीट लक्ष दिले जात नाही. केवळ कांद्याच्या लागवडीनंतर जात आणि हवामानानुसार कांदा ३ ते ५ महिन्यात काढणीस तयार होतो.

कांदा पक्व झाल्यावर नवीन पाने येण्याचे थांबते. पानांतील अन्नरस कांद्यामध्ये उतरून कांदा घट्ट होऊ लागतो. पात पिवळसर होऊ लागते आणि, गड्ड्याच्यावर आपोआप वाकून खाली पडते. यालाच माना पडणे असे म्हणतात.

यावेळी कांद्याची मुळे सुकू लागतात आणि त्यांची जमिनीची पकड सैल पडू लागते. साधारणपणे ३० ते ४० % झाडांच्या माना पडल्यानंतर कांदा काढणीस तयार झाला असे समजावे.

सर्व कांदा एकाच वेळी काढणीला तयार होत नाही. मान पडल्यानंतर आणि पात सुकल्यावर कांदा काढावा. कांदा जसजसा तयार होईल तसतसे काढण्याचे काम खरीप हंगामात करतात.

कारण खरीप हंगामात माना लवकर पडत नाहीत. कांदा पक्व झाला तरीही पातीची वाढ चालूच राहते. अशावेळी पक्व कांदा बधून काढावा परंतु रांगडा किंवा उन्हाळीकांदा काढणीला एकाचवेळी तयार होतो.

या कांद्याची काढणी जानेवारी ते मे महिन्यापर्यंत चालते. या कांद्याच्या माना आपोआप पडतात. सर्व माना पडल्यानंतर कांदा एकाचवेळी काढावा. कांद्याची पात ओलसर असतानाच कांदा उपटून काढावा. पात वाळली तर कांदा उपटून निघत नाही. अशावेळी तो खुरप्याने किंवा कुदळीने काढावा लागतो.

 

kanda lagavd, kandya vishyi mahiti

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading