महाडीबीटी आता नवीन पोर्टलवर जुने पोर्टल झाले बंद

20-03-2023

महाडीबीटी आता नवीन पोर्टलवर जुने पोर्टल झाले बंद

महाडीबीटी आता नवीन पोर्टलवर जुने पोर्टल झाले बंद

सर्व शेतकरी बांधवांसाठी व ऑनलाईन सुविधा केंद्रासाठी अंत्यंत महत्त्वाची बातमी शेतकरी योजनांचे फॉर्म भरण्यासाठी महाडीबीटी शेतकरी नवीन पोर्टल आलेले आहे.

शेतकऱ्यांना शेतीविषयक औजारे, यंत्र, फळबाग लागवड, सिंचन योजना, शेती संबधित इतर महत्वपूर्ण योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना https://mahadbtmahait.gov.in/Login/Login या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागत होता.

काही दिवसापासून महाडीबीटी पोर्टल वरती शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी पोर्टल मध्ये अडचणी होत्या, यामुळे शेतकऱ्यांचा यामध्ये खूप वेळ वाया जात होता. परंतु आता शेतकऱ्यांचा वेळ वाया जाणार नाही. कारण शासनाने २५ जानेवारी २०२३ पासून शेतकऱ्यांसाठी नवीन पोर्टल सुरु केले आहे.

वेबसाईट/पोर्टलमध्ये कोणते बदल करण्यात आले?

  • नवीन पोर्टल/वेबसाईट मध्ये शेतकऱ्यांना जुन्या वेबसाईट प्रमाणेच सर्व प्रोसेस करावी लागणार आहे.
  • नवीन वेबसाईट मधील इंटरफेस हा जुन्या वेबसाईट प्रमाणेच असणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.
  • वेबसाईट मधील URL/Domain मध्ये बदल करण्यात आला आहे.
  • जुने पोर्टल हे mahadbtmahait.gov.in/Login/Login असे होते 
  • आता नवीन पोर्टल हे mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login असे करण्यात आले आहे.

source : farmerscheme

MahaDBT now on new portal old portal closed, mahadbt yojana marathi

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading