महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

26-05-2023

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

!! सावध व्हा! हुशार व्हा, आपलेच नुकसान टाळा !!

सोशल मीडियाच्या माध्यमातून आज आपण सर्वच कांदा उत्पादक शेतकरी बांधव कांदा संदर्भातील हवी ती सर्व माहिती एकमेकांपर्यंत पोहोचवत असतात.

त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच कांदा बियाणे पासून तर कांदा रोप तयार करणे कांदा लागवड कांद्याचे संगोपन तसेच कांदा विक्री व सर्वच बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव याची खरीती माहिती मिळत असते याच सोशल मीडियाच्या माध्यमातून 

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या

फेसबुक ग्रुपमध्ये जवळपास दीड लाख तर व्हाट्सअपवर 650 पेक्षा जास्त ग्रुप मधून लाखो कांदा उत्पादकांना वरील माहिती पोहोचविण्याचे काम केले जात आहे.

कांद्याच्या संदर्भातील हवी ती सर्व माहिती कांदा उत्पादक शेतकरी म्हणून आपल्याजवळ असणे हे नक्कीच गरजेचे आणि फायद्याचे आहे, परंतु आज अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव कांदा मार्केट मधील कांदा गोणी घेऊन येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचा व्हिडीओ संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात व्हाट्सअप आणि फेसबुकवर फिरत आहे.आणि काही अतिउत्साही कांदा उत्पादक शेतकरी हा व्हिडीओ अजून दुसऱ्या ग्रुप मध्ये किंवा फेसबुकला पाठवत आहे. परंतु कांदा उत्पादक बांधवांनो लक्षात घ्या कांद्याची आवक जास्त होणे म्हणजे कांद्याचे बाजारभाव कमी होणे हे आपण वर्षानुवर्षे बघत आलेलो आहोत

त्यामुळे कृपा करून घोडेगाव येथील कांद्याची गोणी घेऊन येणाऱ्या वाहनांच्या रांगा असूद्या किंवा महाराष्ट्रातील कुठल्याही बाजार समितीमध्ये कांदा आवक होत असल्यास त्याबाबत सोशल मीडियावरती फोटो आणि  व्हिडिओ अजिबात टाकू नये सोशल मीडिया वरती कांद्याची खूप आवक झाली आहे अशी माहिती आपणच कांदा उत्पादकांनी टाकल्यामुळे कांद्याची जास्त आवक झाली आहे असे कारण सांगून आपल्याच कांद्याला व्यापारी बांधवांकडून लिलावामध्ये कमी भाव मिळतो

म्हणून सर्व कांदा उत्पादकांना नम्र विनंती की आपण चुकूनही यापुढे कांद्याच्या पावत्या, कांद्याच्या वाहनांच्या रांगा याबाबत कोणत्याही प्रकारे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पाठवू नये आणि आपलेच होणारे नुकसान 100% टाळावे

भारत दिघोळे

संस्थापक अध्यक्ष

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.

 

Onion grower

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading