रोपवाटिकेपासून कांदा पिकातील रोग, कीड नियंत्रण

26-05-2023

 रोपवाटिकेपासून कांदा पिकातील रोग, कीड नियंत्रण

 रोपवाटिकेपासून कांदा पिकातील रोग,

कांदा सल्ला

रब्बी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली असून, काही शेतकऱ्यांची अजून लागवड व्हावयाची आहे. कांद्यावर येणाऱ्या रोगांचे व किडींच्या नियंत्रणासाठी बीज प्रक्रियेपासून काळजी घेतल्यास पीक उत्पादनात वाढ होण्यास चांगली मदत होईल. उशिरा कांदा लागवडी करताना रोपवाटिकेच्या सुरवातीपासून काळजी घेतल्यास निरोगी रोपांची उपलब्धता होईल. 

कांद्यावरील रोगाचे व्यवस्थापन

 रोपवाटिकेतील मर - कांदा पिकाच्या रोपवाटिकेत रोपांवर मर रोग हा फ्युजॅरियम बुरशीमुळे होतो. रोपांची मान जमिनीलगत अचानक कुजून ती कोलमडलेली दिसते. त्याचप्रमाणे बुरशीमुळे लागवडीनंतरही प्रादुर्भाव होऊन मर किंवा सड होते. 

उपाययोजना - रोपवाटिकेची जागा दर वर्षी बदलावी. कांद्याच्या रोपवाटिकेसाठी जमीन उत्तम निचरा होणारी आणि मध्यम प्रतीची असावी.

  1. रोपे गादी वाफ्यावरच तयार करावीत.
  2. बियाणे निरोगी, स्वच्छ व खात्रीचे असावे.

रोपवाटिकेत पेरणी करण्यापूर्वी कॅप्टन किंवा थायरम 3 ग्रॅम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी किंवा ट्रायकोड्रर्मा 5 ग्रॅम प्रतिकिलोप्रमाणे बियाण्याला चोळावी.

 बियाणे पेरणीपूर्वी 3x1 मी. आकाराच्या गादी वाफ्यावर कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड 30 ग्रॅम प्रतिवाफा या प्रमाणात मिसळावे, तसेच पेरणीनंतर 15 दिवसांनी पुन्हा 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दोन्ही ओळीच्या मधोमध ओतावे. लगेच वाफ्याला पोहोच पाणी द्यावे. 

 लागवडीकरिता जमीन उत्तम निचरा होणारी व मध्यम प्रतीची असावी. 

 करपा - कांदा पिकावर जांभळा करपा, काळा करपा व तपकिरी करपा यांचा प्रादुर्भाव आढळून येतो. रब्बी हंगामामध्ये मुख्यत्वे तपकिरी करप्याचा प्रादुर्भाव आढळून येतो. जांभळा करपा खरीप हंगामात, तर काळ्या करप्याचा प्रादुर्भाव भारी जमिनीत पाण्याचा निचरा न झाल्यास आढळून येतो. 

तपकिरी करपा - या रोगाचा प्रादुर्भाव रब्बी हंगामामध्ये स्टेम्फीलियम नावाच्या बुरशीमुळे होतो. पानावर सुरवातीला पिवळसर ते तपकिरी चट्टे पडतात. या रोगामध्ये चट्टे वाढण्याचे प्रमाण बुंध्याकडून शेंड्यापर्यंत वाढत जाऊन तपकिरी पडून सुकतात. यात शेंडे आणि पातीही सुकल्यासारखी दिसतात. 

करपा रोगाचे नियंत्रण उपाययोजना -

पिकांची फेरपालट करावी.

कांद्याच्या रोपवाटिकेत रोपांची उगवण झाल्यानंतर मॅकोझेंब 25 ग्रॅम + कार्बोसल्फॉन 10 मिली + स्टीकर 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गरजेनुसार पुढील फवारणी तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावी.

कांद्यावरील करपा व फुलकिडीच्या एकत्रित नियंत्रणासाठी कांदा लागवडीनंतर 10-15 दिवसांनी व 15 दिवसांच्या अंतराने मॅंकोझेब 25 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम अधिक कार्बोसल्फॉन 10 मिली किंवा ट्रायऍझोफॉस + डेल्टामेथ्रिन हे संयुक्त कीडनाशक 20 मिली अधिक 10 मिली स्टीकर प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. गरजेनुसार पुढील फवारण्या कराव्यात.

कांद्यावरील करपा रोगाची लक्षणे व फुलकिडी मोठ्या प्रमाणात आढळून आल्यास त्याच्या एकत्रित नियंत्रणासाठी टेब्युकोनॅझोल 10 मिली किंवा ऍझोक्‍सिस्ट्राबीन 10 मिली अधिक फिप्रोनिल 15 मिली अधिक 10 मिली स्टीकर प्रति 10 लिटर या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.

कांद्यावरील फुलकिडीचे व्यवस्थापन

कांद्यामध्ये फुलकिडीची पिल्ले आणि प्रौढ कीटक पाने खरडून पानातील रस शोषून घेतात. पानांवर पांढरे ठिपके दिसतात. असंख्य ठिपके जोडले गेल्यामुळे पाने वाकडी होऊन वळतात. दिवसा वाढलेल्या तापमानामध्ये ही कीड पानाच्या बेचक्‍यात खोलवर किंवा बांधावरील गवतामध्ये लपून राहते. या किडीने केलेल्या जखमांमधून करपा रोगाच्या जंतूंचा प्रसार होतो. त्यामुळे करपा रोगाचे प्रमाण वाढते. 

उपाययोजना -

  1. पिकांची फेरपालट करावी.
  2. शेताच्या कडेने मक्‍याच्या दोन ओळींची लागवड करावी.
  3. लागवडीनंतर 30 दिवसांनी 65-70 टक्के आर्द्रता असताना व्हर्टिसिलियम लेकॅनी 5 ग्रॅम प्रतिलिटर या प्रमाणे 8-10 दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
  4. 5 टक्के निंबाळी अर्काची फवारणी करावी.
  5. कांद्याच्या रोपांची लागवड करण्यापूर्वी रोपप्रक्रिया करावी.
  6. कांदा रोपे लावणीनंतर फोरेट (10 जी) हे कीडनाशक एकरी 4 किलो या प्रमाणात वाफ्यात टाकावे.
  7. फिप्रोनिल 15 मिली किंवा सायपरमेथ्रीन (25 ई. सी.) 5 मिली किंवा प्रोफेनोफॉस (50 ई. सी.) 10 मिली लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (5 ई.सी.) 5 मिली 10 लिटर पाण्यातून आलटून पालटून फवारणी करावी.
  8.  कांद्याची पाने गुळगुळीत असल्याने फवारणी करतेवेळी 10 मिली चिकट द्रवांचा (स्टीकर) वापर करावा.

 कांदा उत्पादकांसाठी सुवर्ण संधी 

कांदा उत्पादकबंधूनो आपण कांदा लागवडीसाठी रोपवाटिका तयार करतो  ती पारंपरिक पद्धतीने म्हणजे कुळवाच्या सहाय्याने पट पाडतो व बियाणे पोखतो यात 

  • बरेच बियाणे पाण्याबरोबर वाहून जाते  
  •  बियाणे  माती आड होत नाही म्हणून कमी उगवते 
  •  बियाणे कुठे दाट तर कुठे विरळ उगवते  ज्या ठिकाणी दाट उगवले ते लावनियोग्य उशिरा बनते व विरळ ठिकाणी लवकर बनते
  •  दाट उगवण झाली तर रोप जास्त पावसाने किंवा  हवा व सूर्यप्रकाश न मिळाल्याने  खराब होते

जे बंधू बेडवर बियाणे टाकतात 

  • मजुरी जास्त लागते 
  • मजूर बियाणे टाकताना  एकसारखे टाकत नाहीत  मित्रानो बियाणे एवढे महाग घेतो पण बियाणे टाकण्याची चुकीची पध्दतीने दरवर्षी हजारोचे नुकसान करतो  या सर्व बाबीचा विचार करून आम्ही आपनासाठी घेऊन येत आहोत शासरोक्त पद्धतीने रोपवाटिका तयार करण्यासाठी कांदा बियाणे पेरणी यंत्र (सीड ड्रिल )

तुमचा फायदाच फायदा हा आमचा वादा

  1.  बियाणे उत्कृस्ट असल्यास 100%  बियाने उगवण
  2. मजुरीत 80% बचत 
  3.  लावणीला रोप एक् सारखे  बनणार
  4.  घंटो का काम मिनटोमे  
  5.  मशीन पसंत न पडल्यास पैसे परतिची हमी  

आमचा फक्त मशीन विकने हा उददेश नसून उत्पादन खर्च कमी करणे व नफा वाढविणे हा आहे व आधुनिक रोप वाटीका कशी तयार करावी व रोपांची मर होऊ नये म्हणून उपाय योजना  व  कांद्याचे अधीक  उत्पादन कसे घ्यावे हे सुद्धा मार्गदर्शन मिळेल मग करा विचार   धरा आधुनिकतेचा ध्यास होईल आपला विकास कांदा रोपवाटिका टाकन्यासाठी मनुष्य चलीत बियाणे पेरणी यंत्र (सीड ड्रिल मिळण्याचे  ठिकाण   श्री ऍग्रो एजन्सी  (जळगाव जिल्याचे वितरक )आंबेडकर शॉपिंग कॉम्प्लेक्स  दुकान न.5 व 6 ता.चोपडा जिल्हा.जळगाव  प्रो.डॉ रविंद्र निकम  आदर्श शेतकरी पुरस्कार  जी .प.जळगांव  उत्कृष्ठ कांदा उत्पादक पुरस्कार जेंन इरिगेशन जळगाव  फोन न .9422745953  

 कांदा रोप टाकण्यापूर्वी एक विशेष सूचना

आपण कधी कधी कुणाकडून किंवा दुकानातून नवं जुनं कांद्याचं बियाणं विकत आणतो, ते कधी उतरतं तर कधी उतरत नाही, कधी कमी जास्त उगवतं, त्या वेळी आपला बहुमूल्य वेळ, पैसा वाया जातो, हंगाम माघे पुढे होतो सर्वच नियोजन बदलुन जाते, आपल्यावर पश्चाताप करण्याची वेळ येते, हे सर्व होऊ नये या साठी सोपी पद्धत आहे, आपल्यापैकी बरेचसे ही पद्धत करतही असतील, पण मला चालु पावसाळी  हंगामासाठी मागच्या वर्षीचं जुनं बियाणे टाकायचं होतं, मनात थोडी उगवण क्षमते बाबत शंका असल्यामुळे मी अगोदर सोप्या पद्धतीने उगवण क्षमता तपासुन घेतली, या माहितीचा ग्रुपवर शेतकरी बंधूंना फायदा व्हावा हाच उद्देश.

कांदे बियाणे उगवण क्षमता तपासण्याची पद्धत, लाल पावसाळी कांदे जुने 2019 चे पुड्याचे हे बियाणे आहे, मंगळवारी बारदान ओलं करुन पुड्यातुन मोजुन 300 दाणे बारदानावर टाकले, पुन्हा थोडं पाणी टाकलं, शुक्रवारी पुन्हा पाणी टाकुन बारदान ओलं केलं, आज रविवारी बारदान उघडून बघितलं तर 300 पैकी 248 बियाण्याचे दाणे उतरले, 50 दाणे उतरले नाही, 2 दाणे सापडले नाहीत, 

एकंदरीत 80 ते 85 % उगवण क्षमता असल्याचे लक्षात आले, त्या हिशोबाने आपण आता शेतात बियाणे टाकतांना कमी जास्त प्रमाण करु शकतो.

 

Onion advice, Onion plant, Pest control

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading