कांदा लागवड सविस्तर माहिती

26-05-2023

कांदा लागवड सविस्तर माहिती

कांदा लागवड सविस्तर माहिती

रोपे तयार करणे :- कांद्याची रोपे तयार झाल्यानंतर त्याची परत लागवड साधारण एक ते दीड महिन्याने केली जाते. हेक्टरी ८ ते १० किलो बियाणे पूर्ण होते जर बियाणे उत्तम प्रतीचे मिळेल.मार्च 2020मधले नविन बियाणे पेरणीसाठी वापरल्यामुळे  कांदा बियाणांची उगवण क्षमता टिकून राहते.   

रोपवटीका विहिरीजवळ किंवा पाण्याच्या स्रोताजवळ असावी जेणेकरून पाणी पुरवठा करणे सोपे होईल.  रोपे तयार करण्यासाठी हरळी, लव्हाळा यासारखी गवते असलेली पाणी साचणारी जागा निवडू नये.  अतिउष्णतेमुळे रोपांचे संरक्षण करणे आवश्यक असते. या काळात रोपवाटीकेची जागा अशी निवडावी की जेणेकरून रोपांवर दुपारची सावली राहील, म्हणजेच उंच झाडा जवळ जागा असावी किंवा शेतात नसल्यास तशी तात्पुरती सावली करावी.

 बी पेरण्यापूर्वी जमीन भिजवून घ्यावी व पेरणी १० ते १२ दिवसांनी करावी म्हणजे वाळलेले गवत तणमोड होईल. रोपवाटिकेत तणाचा आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी जमीन खोल नांगरून मशागत करावी. जमीन चांगली भुसभुशीत करून घ्यावी.

एक हेक्टर क्षेत्र लागवडी साठी अंदाजे १० गुंठे क्षेत्रात रोप टाकावे.

बरेचसे शेतकरी सपाट वाफ्यात रोप तयार करतात. परंतु गादी वाफ्यावर रोपांची वाढ जोमाने व एकसारखी होत असल्याने रोपे गादी वाफ्यावर तयार करणे फायद्याचे ठरते. त्याचप्रमाणे रोपांच्या मुळाजवळ पाणी साचून राहत नसल्यामुळे रोपांची कुज किंवा सडने टाळता येणे शक्य होते.  गादी वाफ्यातील रोपे सहज उपटली जातात तसेच रोपांच्या गाठी जाड आणि लवकर तयार होतात. गादी वाफे उताराला आडवे बांधावे. गादी वाफे एक ते दिड मीटर रुंदीचे ३ ते ४ मीटर लांबीचे आणि १५ ते २० सेंटीमीटर उंचीचे तयार करावे.

प्रत्येक वाफ्यात वाफे तयार करताना दोन घमेले चांगले कुजलेले कंपोस्ट /शेणखत अथवा उपलब्ध असल्यास गांडूळ खत टाकावा.  गादी वाफे तयार करणे शक्य नसल्यास नेहमी प्रमाणे सपट वाफे करावे. साधारणतः १ मी.रुंद व ३ ते ४ मीटर लांबीचे सपाट वाफे तयार करून त्यामध्ये रेषा ओढून ओळीने बी पेरावे. 

गादी वाफ्यावर ८ ते १०  सें.मी  अंतरावर व २ सेंटीमीटर खोल रेषा ओढून पातळ बी पेरावे. साधारणपणे प्रत्येक चौरस मीटर वर १० ग्रॅम बी पेरावे म्हणजे एका गादीवाफ्यावर ३० ग्राम बियाणे पडेल. पेरलेले बी हलक्याशा मातीने झाकावे व वाफ्यात उगवून   येईपर्यंत झारीने पाणी द्यावे. रोपे उगवून आल्यावर ती निरोगी राहतील याची काळजी घ्यावी. रोपे स्थालांतरासाठी रानबांधणी मुळे ५ ते ६ सेमीं लांब असावे ती उथळ असल्याने बारच्या थराची मशागत करणे गरजेचे असते.

 जमिनीची नांगरट करून उभ्या आडव्या कुळवण्या देवून रान भुसभुशीत करावे.  तसेच नांगरताना चांगले कुजलेले शेणखत रानामध्ये टाकले गेले पाहिजे. जमिनीचा प्रकार, उतार,  हंगाम,  पावसाचे प्रमाण ओळीताचे साधन इत्यादीचा विचार करून रानबांधणी करणे गरजेचे असते. खरीपात ‘सरी-वरंब्यावर लागवड करावी.  माती परिक्षण करून शिफारशीनुसार रासायनिक खते पूर्ण लागणीचे अगोदर किंवा लागण करताना वाफ्यात टाकावीत. इतर हंगामात सपाट वाफ्यात लागवड करावी.

पुर्नलागवड : रब्बी हंगामात ७ ते ८ आठवड्यात तर खरीपात ६ ते ७ आठवड्यात रोपे लागणीसाठी तयार होतात. साधारणत: ६ ते ८ आठवड्यात रोपे लागणीस योग्य होतात. लागवडीच्या वेळी रोपांच्या कंदांची वाढ निदान हरभ-याएवढी असावी. स्थलांतर करण्या अगोदर एक-दोन दिवस आधी हलके पाणी द्यावे म्हणजे रोपे सहज उपटतील व लूसलुशीत राहतील. रोपे सरीच्या दोन्ही बाजूस १० ते १५ सेंमी अंतरावर लावावीत. सपाट वाफ्यात दोन ओळीत १५ सें.मी तर दोन रोपात १० सें.मी अंतर ठेवून लागवड करावी.अॅझोटोबॅक्टर हे जीवाणूखत पाण्यात मिसळून त्यामध्ये रोपांची मुळे पाच मिनिटे लागवड करण्याअगोदर बुडवावीत.

बी पेरून कांदा लागवड :-  सध्या शेतीसाठी मजूर मिळणे अवघड झाल्याने अलीकडे महाराष्ट्रात बरेच शेतकरी रोपे तयार न करता थेट शेतात रानबांधणी करून त्यांमध्ये बी फिसकटून पेरणी करतात. अशा प्रकारच्या पेरणी पद्धतीचा अवलंब वाढू लागला आहे. शेतकरी सरळ बी पेरून कांदा लागवड करतात कारण दिवसेंदिवस मजुरांचा तुटवडा तसेच त्यांच्या रोजगाराची वाढ यामुळे लागवड खर्च वाढतो. परंतु या पद्धतीत कमी जास्त प्रमाणात पडते आणि सारखे पडत नाही. जर या प्रकारे पेरणी केली तर विरळणी करून योग्य प्रमाणात रोपांची संख्या वाढवावी.

अंतरमशागत,पाणी व्यवस्थापण: पिकाच्या चांगल्या वाढीसाठी दोन तीन खुरपण्या करणे गरजेचे असते.लागवड पेरणीची ३० ते ४० दिवसांनी फक्त एकवेळा खुरपणी केल्याने तणांचे नियंत्रण होते. पिकाची वाढीची अवस्था, लागवडीचा हंगाम, जमिनीचा प्रकार यावर पाण्याचे प्रमाण आणि दोन पातळीतील अंतर हे अवलंबून असते. खरीप हंगामात गरजेनुसार पाणी द्यावे रब्बी हंगामात 10 ते 12 दिवसांनी पाणी द्यावे त्याचप्रमाणे उन्हाळी हंगामात सहा ते आठ दिवसांनी पाणी द्यावे कांद्याची पूर्ण वाढ होऊन पाने पिवळी पडून माना पडू लागल्यावर काढणीपूर्व 15 ते 20 दिवस अगोदर पाणी देऊ नये. त्यामुळे कांदा पक्व होण्यास मदत होते आणि कांदे घट्ट होतात वरचा पापुद्रा सुकून कांद्याला चकाकी येते. कांद्याला तुषार किंवा ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देऊन चांगले उत्पादन घेता येते.

 30 ते 40 दिवसांपर्यंत तन एकदा किंवा दोनदा काढुन घ्यावे.

काढणी व सुकवणी: लागवडीनंतर कांदा पीक 110 ते 140 दिवसांत काढण्यात येतात कांदा पक्व  झाला कि नाही हे पातीचा रंग पिवळसर दिसू लागल्यावर कळते. कांद्याच्या पातीचा भाग मऊ होऊन आपोआप वाढतो व पात कोलमडते यालाच माना मोडणे असे म्हणतात अशाप्रकारे ५०% माना मोडल्या की कांदा काढणीस आला असे समजावे. नंतर पाणी देणे बंद करावे. नंतर हळूहळू कांद्याच्या मुळाशी आलेले मुळे सुकून त्याची जमिनीवरची पकड सैंल पडू लागते. त्यामुळे कांदा हाताने सहज उपटला जातो. कांदा काढणी झाल्यानंतर चार ते पाच दिवस शेतात ठेवा. या काळात माना वाळून कांद्याचा कंद घट्ट होतो कांद्याचा पापुद्रा पक्व होऊन रंग सुद्धा भडक होतो. त्याचप्रमाणे चार-पाच दिवसानंतर कांद्याच्या मानेला पीळ देवून ३ ते ४ सेंमी मान ठेवून कांद्याची पात कापावी व असे कांदे सावलीत तीन आठवडे पातळ थर देवून कांदा साठवण्यापूर्वी किंवा बाजारात विक्रीस पाठवण्यापूर्वी प्रतवारी करून घ्यावी. 

जोडकांदे आणि डेंगळे– कांदे पिकांमध्ये काही वेळा जोडकांदे व डेंगळयांचे प्रमाण आढळून येते. कांदा लागवड करताना दोन ओळीतील अंतर 12 ते 15 सेंटिमीटर आणि दोन रोपांतील अंतर ६ ते १० सेंमी ठेवावे. अनियमित पाणी पुरवठा असेल तर दुबाळके येतात. कांदा पोसताना पाण्याचा ताण पडल्यास आणि त्यानंतर पाणी दिल्यास कांद्याच्या वरच्या पापुद्रयाला आतील वाढीने तडे जातात. आणि जोडकांद्याचे प्रमाण वाढते फुलांची दांडे हे कमी प्रकाशाचा कालावधीत आणि हवामानातील चढ-उतार यामुळे येतात. कांदा पिक ४  ते ५  पानांवर असताना ४  ते ५  अंश सें.ग्रे. तापमान राहिल्यास दांडे येतात तसेच जास्त वयाची रोपे लावल्यास आणि जर नत्राचे प्रमाण कमी पडले तर कांद्यास डेंगळे येतात. जोडकांदे व डेंगळे येवू नयेत यासाठी रोपातील योग्य अंतर, योग्य वेळी पाणी देऊन योग्य प्रमाणात खते द्यावे.

रोग व किडींचे व्यवस्थापन –

  • किडी : कांद्यावर मुख्यतः फुलकिडे  म्हणजेच टाक्या ( थ्रिप्स ) या किडीचा प्रादुर्भाव आढळतो.  फुलकिडे आकाराने अत्यंत लहान पाचरीसारखे पिवळसर तपकिरी रंगाचे असतात.  पूर्ण वाढलेली किडी सुमारे एक मी.मी. लांबीच्या असतात.  त्यांच्या शरीरावर फुलीच्या आकाराचे गडद चट्टे असतात. ही किड पानातील रस शोषून घेतात आणि शोषण करताना किडींनी असंख्य चावे घेतल्यामुळे पानावर पांढरे ठिपके किंवा डाग दिसतात त्यालाच ‘ टाक्या ‘ म्हणतात.  असे असंख्य ठिपके जोडले जातात व त्यामुळे पाने वेडीवाकडी  होतात आणि वाळतात. काही वेळेस फुलकिड्यांनी केलेल्या जखमातून ‘ काळा करपा किंवा जांभळा करपा ‘ या रोगाच्या बुरशीच्या प्रादुर्भाव वाढतो. यासाठी १० ते १५ दिवसांचे अंतराने आलटून पालटून गरजेनुसार फवारण्या कराव्यात.
  1. रोपे गादीवाफ्यावर व निचऱ्याच्या जागेत तयार करावीत.
  2. पुर्नलागण सरी वरंब्यावर करावी.

 कांदा पिकामध्ये डेंगळे येणे :

कांदा पिकामध्ये डेंगळे (फुलांडे दांडे) अपेक्षित नसतात. कारण त्यामुळे कांद्याचा दर्जा खालवतो. परिणामी आर्थिक नुकसान होते. असे कांदे निर्यातीसाठी आणि साठवणीसाठी वापरता येत नाहीत. हा दोष येण्याच्या प्रमुख कारणांमध्ये हंगामातील लवकर लागवड याचा समावेश आहे.

रब्बी पिकांची लागवडमध्ये डिसेंबरच्या अगोदर केली तर कंद वळण्याच्या अवस्थेमध्ये पडणाऱ्या थंडीचा परिणाम होऊन पिकात डेंगळे येण्याची शक्यता बळावते तसेच जास्त वय असलेली जून रोपांची लागवड हे एक कारण आहे. यात रोपवाटिकेमध्ये कांद्याची गाठ आली असेल म्हणजेच जास्त वयाची रोपे लागवडीसाठी वापरली असतील तर डेंगळे येण्याची शक्यता वाढते.

 लागवडीसाठी योग्य रोपे म्हणजे ज्यांची वाढ २५ ते ३० से.मी. व मुळांकडील भाग फुगीर झालेला असावा तसेच नत्र व स्फुरदयुक्त खतांचे असंतुलित प्रमाण या कारणात नत्र व स्फुरदयुक्त खतांचे असंतुलित प्रमाण म्हणजेच नत्र कमी स्फुरद अधिक झाले किंवा स्फुरदायी मात्रा शिफारशीपेक्षा जास्त झाल्यास पिकांमध्ये डेंगळे अधिक येतात.

 याशिवाय थंडीचा कालावधी अधिक काळापर्यंत विशेषत: कंद वळण्याच्या व वाढण्याच्या अवस्थेमध्ये उशिरा थंडी पडली व त्यानंतर तापमानात अडानक वाढ झाली तर डेंगळे येण्याचे प्रमाण खूप जास्त असू शकते, असे या वर्षी अनुभवास आले. याशिवाय कांदा काढणीसाठी तयार झाला तरीही शेतात राहू दिला व वातावरणातील तापमान कमी असेल तर डेंगळे येण्यास सुरूवात होते. अशा वेळी डेंगळे येण्यासोबत कंद फुटण्याचे व जोड कांदे होण्याचे प्रमाण वाढते. संजीवकांच्या अनावश्यक वापरामुळेही हे होते.

 

kanda lagavd, kanda vishyi mahiti

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading