खरिप पिकांची बीजप्रक्रिया कशी करायची? बीजप्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी

25-05-2023

खरिप पिकांची बीजप्रक्रिया कशी करायची? बीजप्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी

खरिप पिकांची बीजप्रक्रिया कशी करायची? बीजप्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी

  • जमिनीतून व बियाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो 
  • बियाण्यांची उगवण क्षमता वाढते. रुपे सतेज व जोमदारपणे वाढतात. 
  • पिकाच्या उत्पादनात वाढ होते.  
  • बीजप्रक्रियासाठी कमी खर्च येतो. त्यामुळे कीडरोग विनंत्रणाची ही किफायतशीर पद्धत आहे.
तूर ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम किंवा कार्बोॉक्झीम ३७.५ टक्के डब्ल्यू एस. + थायरम ३७.५ टक्के डब्ल्यू. एस. प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी.मर रोग, मुळकुजव्या खोडकुज
रायझोबियम आणि स्फुरद विरघळवणारे जिवाणू प्रत्येकी २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणामध्ये मिसळून चोळावे. बियाणे अर्धा तास सावलीत सुकवून पेरणी करावी. नत्र स्थिरीकरणासाठी व स्फुरद उपलब्धते साठी
पेरणीसाठी बियाणे साठविताना अॅझंडिरेक्टीन ३०० पीपीएम (५ मिली / किलो) बियाण्यास बिजप्रक्रिया करावी.पेरणीसाठी बियाणे साठविताना
मृग / उडीद प्रति किलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्माची बिजप्रक्रिया करावी. मर मुळकुजव्या
रायझोबियम (चवळी गटाचे) आणि स्फुरद विरघळवणारे जिवाणू प्रत्येकी २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणामध्ये मिसळून चोळावे. बियाणे अर्धा तास सावलीत सुकवून पेरणी करावी. नत्र स्थिरीकरणासाठी व स्फुरद उपलब्धते साठी
सोयाबीन कारबॉक्झीन ७५ टक्के डब्ल्यु. पी. २ ते २.५ ग्रॅम किंवा कारबॉक्झीन ३७.५ टक्के + थायरम ३७.५ टक्के (मिश्र घटक) २ ते ३ ग्रॅम प्रति किलो किंवा ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा भुकटी बियाण्यास चोळावी. मुळकुज, खोडकुज
फ्ल्युक्झपायरॉक्ड ३३.३ टक्के एफ.एस. १ मि.ली. प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी.रायझोटोनीया बुरशीमुळे होणारी मुळांची सड 
थायामेथोक्झाम ३४ टक्के एफ.एस. १० मि.ली. प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी.खोडमाशी
थायोफनेट मिथाईल ४५ टक्के + पायक्लोस्ट्रॉबीन ५ टक्के एफ.एस. २ मि.ली. प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी.रोपावस्थेतील कुज
रायझोबियम २५ ग्रॅम आणि स्फुरद विरघळवणारे जिवाणू २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बीज प्रक्रिया करावी. बियाणे आर्धा तास सावलीत सुकवून पेरणी करावी. (प्रथम बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी नंतर रायझोबियम व इतरची प्रक्रिया करावी.)नत्र स्थिरीकरणासाठी व स्फुरद उपलब्धते साठी 

बीजप्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी

बीजप्रक्रिया करण्याचा क्रम

• सर्वप्रथम रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी.

• ह्यानंतर कीटकनाशकाची बीजप्रक्रिया करावी

• त्यानंतर ३-४ तासांनी रायझोबियम / ऍझोटोबॅक्टरची बीज प्रक्रिया करा

• सर्वात शेवटी पी. एस. बी. ची बीज प्रक्रिया करावी.

• रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करताना बियाणे प्रक्रियेसा वापरलेले मातीचे किंवा प्लास्टिकचे भांडे यांचा वापर अन्न शिजवण्यासाठी करू नये.

• बीजप्रक्रिया नंतर शिल्लक राहिलेले बियाणे जनावरांच्या किंवा मनुष्याच्या खाण्यासाठी वापरू नये.

 source : krushi vibhag maharashtra shasan

bijprakriya, biyane prakria

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading