कापूस लागवडीची माहिती व योग्य वाणाची निवड

11-05-2023

कापूस लागवडीची माहिती व योग्य वाणाची निवड

कापूस लागवडीची माहिती व योग्य वाणाची निवड 

कापूस :-

कापूस हे राज्यातील दुसरे महत्त्वाचे नगदी पिक असून २०१२-२०१३ मध्ये त्याखालील क्षेत्र देशातील एकूण क्षेत्राच्या ३५ टक्के (४१.४६ लाख हेक्टर) इतके आहे. तथापी, कापूस रुईची दर हेक्टरी उत्पादकता (४९६ कि/हे) ही राष्ट्रीय उत्पादकतेपेक्षा (३०५ कि) कमी आहे. राज्यामध्ये जवळजवळ ९५ टक्के क्षेत्रावर बी.टी. वाणाची लागवड झाली होती.

उन्हाळी बागायती कपाशी :-

कपाशीचे पीक हे जास्त कालावधीचे पीक आहे. कपाशीसाठी स्वच्छ उबदार व कोरडे हवामान अनुकूल असते. कपाशीच्या बियाण्याची उगवण होण्यासाठी १८ ते २० अंश सेल्सिअस, अधिक वाढ होण्यासाठी २० ते २७ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची आवश्यकता असते. कपाशीसाठी किमान व कमाल तापमान १५ ते ३५ अंश सेल्सीअस व हवेतील आर्द्रता ७५ टक्क्यांपेक्षा कमी असावी लागते. उष्ण दिवस आणि थंड रात्र याप्रकारचे हवामान बोंडे चांगली भरण्यास व उमलण्यास उपयुक्त असते.

कपाशीचे पीक सुमारे सहा महिने शेतात राहत असल्यामुळे योग्य जमिनीची निवड अत्यंत महत्त्वाची असते. कपाशी लागवडीसाठी काळी, मध्यम ते खोल (९० सें.मी) व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिन निवडावी. उथळ, हलक्या क्षारयुक्त आणि पानथळ जमिनीत कपाशीची लागवड करण्याचे टाळावे. अन्नद्रव्याची उपलब्धता व जमिनीचा सामू याचा परस्पर संबंध असल्याने जमिनीचा सामू साधारणत: ६ ते ८.५ पर्यत असावा.

कपाशीच्या झाडांची मुळे जमिनीत ७० ते ९० दिवसात ६० ते ९० सें.मी पर्यंत खोल वाढतात. कपाशीच्या मुळांची वाढ चांगली व्हावी यासाठी, एक खोल नांगरट व २ ते ३ कुळवाच्या पाळ्या देऊन ढेकळे फोडावीत. आधीच्या पिकांची धसकटे, पळकाट्या, पाला व इतर कचरा गोळा करुन तो जाळावा व शेत स्वच्छ ठेवावे. त्यामुळे कीड व रोग यांच्या सुप्तावस्था नष्ट होण्यास मदत होते. शेणखत वा कंपोस्ट खत हेक्टरी २५ गाड्या या प्रमाणात मिसळावे. ९० सें.मी. अंतरावर उथळ स-या पाडाव्यात, उथळ स-यांमुळे कपाशीला आवश्यक तेवढे पाणी देता येते व त्यामुळे पाण्याची बचत होते. खोल व रुंद स-यांमुळे झाडाची मुळे वर राहतात व जादा पाण्यामुळे पिकांची कायिक, शाकीय वाढ जास्त होऊन उत्पादनात घट येते. शिवाय पाणीही जरुरीपेक्षा जास्त दिले जाते. स-यांची लांबी जमिनीच्या प्रकारानुसार ६ ते ८ मीटर ठेवावी.

पेरणीतील अंतर :-

उन्हाळी बागायती कपाशीमध्ये पेरणीचे अंतर ही बाब अतिशय महत्त्वाची ठरते. कपाशीच्या दोन ओळींतील व दोन झाडांतील अंतरावर कपाशीच्या दर हेक्टरी झाडांची संख्या अवलंबून असून त्यासाठी पुढील प्रमाणे अंतर ठेवावे. वाणाचा प्रकार

  •  
वाणाचा प्रकारपेरणीचे अंतर (सें.मी)हेक्टरी झाडांची संख्याएकरी झाडांची संख्या
  1. सुधारित
  •  
९० X ६०
  • ,५१८
  • ,४०७
 
  1. संकरित
अमेरिकन X अमेरिकन९० X ९०
  • ,३४५
  • ,९३८
 
अमेरिकन X इजिप्शियन९० X १२०
  • ,२५९
  • ,७०३
 

 

पेरणीसाठी वाणांची निवड :-

बागायती कपाशीसाठी सुधारित/संकरित वाणांची निवड करणे अतिशय महत्त्वाचे असते. त्यासाठी शिफारस केलेल्या वाणांची पेरणी करावी तसेच बियाणे प्रमाणीत असल्याची खात्री करुनच विकत घ्यावे. उन्हाळी हंगामात दख्खन कालवे विभागात लागवडीसाठी पुढील वाणांचाच वापर करावा.

वाणकालावधी (दिवस)उत्पादन (क्वि./हे.)रुईचा उतारा (टक्के)धाग्याची लांबी (मि.मी)हेक्टरी बियाणे (किलो)शिफारस केलेले जिल्हे
सुधारित वाण अ) अमेरिकन
१.एलआरए ५१६६१६०-१७०२०-२२३५-३६२६-२७७-८कापूस पिकविणारे सर्व जिल्हे
२.जेएलएच - १६८१५०-१६०१५-२०३५-३६२६-२७७-८महाराष्ट्रातील खानदेश विभाग
३.फुले ६८८१५०-१६०२२-२५३७२६-२७७-८महाराष्ट्रातील दख्खन कालवे विभाग
संकरित वाण अ) अमेरिकन X अमेरिकन
१.एच -१०१६०-१७०२५-२८३६-३७२६-२७२.५-३कापूस पिकविणारे सर्व जिल्हे
ब) अमेरिकन X इजिप्शियन
१.डीसीएच-३२१८०-१९०१२-१५३२-३३३४-३५२.५-३सांगली, सातारा, सोलापूर
२.फुले -३८८१७०-१७५१५-२०३३-३४३४-३५२.५-३सांगली, सातारा, सोलापूर

 

महाराष्ट्रातील शिफारशीत निवडक बीटी संकरित कापूस वाण

  1. अमेरिकन X अमेरिकन
कंपनीचे नाव/संस्थेचे नावबी.टी.संकरित वाण
राशी सीड्स, अतूर, तामिळनाडूराशी-२, शक्ती-९, साई, राशी- ६५६
अंकूर सीडस् नागपूरअंकुर ०९, अंकुर ६५१, जय
महिको सीडस्, जालनाएमआरसी – ७३२६, एमआरसी – ७३५१
अजित सीडस्, औरंगाबादअजित -११, अजित-१५५, अजित-१७७, अजित १९९
कृषिधन सीडस्, जालनाकेडीसीएच-४४१ त्रिनेत्र
नाथ सीडस्, औरंगाबादएनसीईएच -२ आर
तुलसी सीडस्, गुंटुरतुलसी – ४
विक्रम सीडस्, अहमदाबादव्ही आयसीएच-५, व्ही आयसीएच-१५
जे.के.सीड्स, हैद्राबादवरुण, दुर्गा
न्युज्युविड् सीड्स लि., हैद्राबादबन्नी, मल्लिका, कनक -९५४, भक्ति
पारस सिड्सब्रह्मा

देशामध्ये सन २०१२-१३ पर्यंत १००० पेक्षा अधिक बीटी वाण आहेत. शेतक-यांनी आपल्या गरजेनुसार वाणाची निवड करावी.

ब) अमेरिकन X इजिप्शियन

कंपनीचे नावबी.टी.संकरित वाण
नाथ सीडस्, औरंगाबादकाशिनाथ
कृषिधन सीडस्, जालनासुपर फायबर
महिको सीडस्, जालनाएमआरसी – ७९८१
अंकूर सीडस् नागपूरअंकूर – १९५१
न्युज्युविड् सीड्स लि., हैद्राबादएन.सी.एच.बी.९९२

 

  • बीजप्रक्रियाबुरशीनाशक

अप्रमाणित बियाण्यास थायरम बुरशीनाशकांची प्रक्रिया प्रति किलो बियाण्यास ३ ग्रॅम या प्रमाणात करावी. त्यामुळे मर, करपा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.

  • जीवाणू संवर्धक

हवेतील नत्राचे स्थिरीकरण करुन नत्र खतांच्या मात्रेत बचत करण्यासाठी अॅझोटोबॅक्टर किंवा अॅझोस्पिरीलम या जीवाणू संवधर्काची प्रति किलो बियाण्यास २५ ग्रॅम या प्रमाणात प्रक्रिया करावी. तसेच जमिनीतील मातीच्या कणांद्वारे धरुन ठेवलेले स्फुरद पिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी स्फूरद विरघळणा-या जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी म्हणजे नत्र व स्फुरदयुक्त खताच्या मात्रेमध्ये जवळजवळ २५ ते ३० टक्के बचत होते.

पेरणी :-

बागायती बिगर बीटी कपाशीची पेरणी वेळेवर करणे अत्यंत आवश्यक आहे. पेरणी उशिरा झाल्यास वेचणीच्या वेळी पाऊस येऊन नुकसान संभवते किंवा त्यावर किडी व रोगांचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनाता घट येते. पेरणी झाल्यानंतर लगेचच ४ ते ६ इंच आकाराच्या सच्छिद्र पॉलिथिन पिशव्यांमध्ये माती आणि कंपोस्ट अथवा शेणखत भरावे व भरपूर पाणी द्यावे. नंतर प्रत्येक पिशवीवर २ ते ३ बिया लाव्याव्यात. या पिशव्यांचा उपयोग नांगे भरण्यासाठी करावा. तोपर्यंत पिशव्या झाडाच्या सावलीत ठेऊन त्यांचे किडीपासून सरंक्षण करावे व वरचेवर पाणी द्यावे. साधारणपणे एका एकराच्या नांग्या भरण्यासाठी २५० ते ३०० पिशव्या पुरतात.

वेगवेगळ्या भागासाठी, उदा. 

१) सोलापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांसाठी मार्चचा पहिला पंधरवडा, 

२) अहमदनगर जिल्हयासाठी एप्रिलचा पहिला पंधरवडा आणि 

३) खानदेश, विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी मे चा दुसरा पंधरवडा, याप्रमाणे पेरणीच्या वेळीची शिफारस केलेली आहे. पेरणी करताना सरीच्या मध्यावर २-३ इंच खोल खड्डा करावा व त्यात शिफारस केल्याप्रमाणे रासायनिक खते, बिया टाकून पूर्णपणे मातीने झाकावे व लगेच पाणी द्यावे. तसेच सरी पाडण्यापूर्वी शेणखत दिले नसल्यास प्रत्येक खड्ड्यात रासायनिक खतांबरोबर शेणखत द्यावे.

बीटी कपाशी वाणांची लागवड वातावरणाचे तापमान ३५ डि.से.पेक्षा कमी झाल्यावरच (२५ मे नंतर) करावी. तसेच कपाशीची लागवड जमीन ओलावून वापशावर करावी.

बागायती कपाशीसाठी रासायनिक खते :-

बागायती कपाशी ही रासायनिक खतांच्या मात्रांना योग्य प्रतिसाद देते म्हणून खतांचा पुरवठा ही एक महत्त्वाची बाब आहे. संकरित कापसासाठी प्रति हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश, तर सुधारित वाणांसाठी ८० किलो गाड्या शेणखत शेवटच्या कुळवाच्या पाळी अगोदर द्यावे किंवा खते कमी असल्यास लागवडीच्या वेळी प्रत्येक फुलीवर छोटा खड्डा घेऊन त्यात ओंजळभर शेणखत टाकावे व मातीत चांगले मिसळावे.  वीस टक्के नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व उरलेले नत्र समान दोन हप्त्यांत पेरणीनंतर ३० व ६० दिवसांनी द्यावे. बीटी वाणासाठी शिफारशीत खतमात्रेपेक्षा २५ टक्के रासायनिक खतमात्रा (१२५:६५:६५ किलो प्रति हे.) जास्त घ्याव्यात.

द्रवरुप खतांचा वापर करताना माती परिक्षण अहवालाचा अभ्यास करुन खतांच्या मात्रा देणे योग्य ठरते. नत्र, स्फुरद व पालाश या प्रमुख घटकांव्यतिरिक्त कापूस पिकास मॅग्नेशियम, गंधक, लोह, जस्त, मॅगनीज आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची सुध्दा गरज असते. ही अन्नद्रव्ये विद्राव्य खतांमध्ये उपलब्ध असतात. सूक्ष्म अन्नद्रव्यांमुळे बोंडाची पूर्णपणे वाढ होऊन बोंडे लवकर फुटतात. द्रवरुप खते संचाद्वारे देण्यासाठी व्हेंचुरी किंवा खत टाकी इंजेक्टर पंप या साधनांचा वापर करावा.

आंतरमशागत

  • नांग्या भरणे

सर्वसाधारणपणे १० दिवसांत सर्व बिया उगवतात, ज्या ठिकाणी बी उगवले नसेल त्या ठिकाणी राखून ठेवलेल्या बियाण्यापासूनच, त्याच सुधारित अगर संकर वाणाचे नांग्या भरण्यासाठी वापरावे व लगेच पाणी द्यावे, किंवा वर उल्लेख केल्याप्रमाणे पॉलिथिन पिशव्यांतील रोपे २० ते २५ दिवसांच्या आतच लावावीत.

  • विरळणी

पंधरा दिवसांनंतर प्रत्येक फुलीवर दोनच जोमदार रोपे ठेऊन बाकीची उपटून टाकावीत. विरळणी जमीन ओली असताना करावी.

  • खुरपणी

पेरणीनंतर जरुरीप्रमाणे दोन खुरपण्या व कोळपणी करुन ६० दिवसांपर्यंत पीक तणविरहीत ठेवावे. यासाठी जेथे शक्य असेल तेथे जरुरीप्रमाणे रासायनिक तणनाशकांचा वापर करावा. त्यासाठी खालीलप्रमाणे एक रासायनिक तणनाशक वापरावे व आवश्यकतेप्रमाणे पिकाच्या खुरपण्या कराव्यात. तणनाशकामुळे खुरपणीच्या खर्चात बचत होते.

अ.क्रतणनाशकाचे नावक्रियाशील घटकाचे हेक्टरी प्रमाणहेक्टरी पाण्याचे प्रमाणफवारणीची वेळ
पेन्डीमिथॅलिन१.५ लिटर५०० लिटरउगवणीपूर्वी एक फवारा
क्युझॉलोफॉपइथिल१.५ लिटर५०० लिटरपेरणीनंतर १०-३५ दिवसापर्यंत

भारी जमिनीत विशेषत: रासायनिक खते व पाणी जास्त दिले तर बागायती क्षेत्रातील संकरित वाणांची कायिक वाढ जास्त होते. त्यामुळे बोंडे लागण्याचे प्रमाण कमी होते व बोंडाच्या वजनामुळे फांद्या मोडण्याचा संभव असतो. यासाठी पीक ७० ते ८० दिवसांचे झाल्यावर झाडाच्या मुख्य फांदीचा शेंडा  खुडावा, यामुळे पिकात हवा खेळती राहते. बोंडे सडत नाहीत व कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.

Selection of suitable variety for cotton cultivation, kapus

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading