शेतकऱ्यांना हमखास नफा करून देणारी उन्हाळी पिके

14-01-2023

शेतकऱ्यांना हमखास नफा करून देणारी उन्हाळी पिके

शेतकऱ्यांना हमखास नफा करून देणारी उन्हाळी पिके 

भारत हा एक कृषिप्रधान देश आहे त्यामुळे आपल्या देशातील 90 टक्केपेक्षा जास्त जनता ही शेती व्यवसायावर अवलंबून आहे. साधारणतः आपल्या देशामध्ये पिकांचे 2 वेगवेगळे हंगाम असतात त्यामध्ये रब्बी हंगाम आणि दुसरा खरीप हंगाम. या दोन्ही हंगामात वेग वेगवेगळी पिके घेतली जातात. कारण ज्या त्या हंगामात ज्या त्या पिकाला पोषक हवामान आणि वातावरण मिळत असते.

आपल्या राज्यात अनेक असे जिल्हे आहेत जे सदा कोरडे असतात त्यामध्ये विदर्भ, गडचिरोली, लातूर यांचा समावेश आहे. बऱ्याच वेळा रब्बी आणि खरीप हंगाम उरकल्यावर उन्हाळ्यात कोणती पिके करावीत याचा विचार करत असतो.उन्हाळ्यात अशी पिके करावीत की जी आपल्याला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त उत्पन्न काढून देतील.

1) कलिंगड:-
उन्हाळ्यात बऱ्याच ठिकाणी कलिंगडाची लागवड केली जाते. कलिंगडाच्या पिकाचा कालावधी हा 3 महिन्यांचा असतो. शिवाय उन्हाळ्यात कलिंगडाला प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी सुद्धा असते. आणि बाजारात भाव सुद्धा चांगला मिळतो या साठी उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये शेतामध्ये कलिंगड किंवा खरबूज ची लागवड करून भरघोस फायदा मिळवावा.

2) हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या:-
उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये बाजारात हिरव्या पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता असते त्यामुळे उन्हाळ्यात शेतामध्ये हिरव्या पालेभाज्यांचे उत्पन घेणे फायदेशीर ठरते शिवाय भाजीपाल्याचा कालावधी हा 1 ते दीड महिन्यांपर्यंत असल्यामुळे कमी वेळात जास्त पैसे मिळतात. उन्हाळ्यात शेतामध्ये मेथी, शेपू, चाकवत, पालक आणि कोथिंबीर यांची लागण करावी. याचबरोबर काही फळभाज्या सुद्धा चांगले उत्पन्न मिळवून देतात. यामध्ये दोडका,टोमॅटो, कारले काकडी आणि भोपळा यांची लागवड करून भरघोस उत्पन मिळवू शकतो.

3) मिरची:-
उन्हाळ्यात सर्वात जास्त भाव खाते ती म्हणजे मिरची. मिरचीला उन्हाळ्यात प्रचंड मागणी असल्यामुळे दरात मोठी वाढ होते तसेच मिरचीचा कालावधी हा 5 महिन्यांपासून 3 वर्ष एवढा असतो. उन्हाळ्यात हिरव्या आणि लाल मिरच्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते.

4)ऊस:-
उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये उसाची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते. कारण उसामधून आपण हुकमी उत्पन्न मिळवू शकतो शिवाय उसाचा कालावधी हा 12 महिने असला तरी यातून आपल्याला चांगले उत्पन्न मिळते.

5)उन्हाळी मूग आणि उन्हाळी कांदा:-
ही दोन्ही पिके उन्हाळ्याच्या मध्य काळात घेतली जातात म्हणजेच पावसाळ्याच्या तोंडावर घेतली जातात. उन्हाळी मुगाला आणि कांद्याला बाजारात मोठ्या प्रमाणात भाव मिळतो शिवाय मुगाला अत्यंत कमी कष्ट लागतात त्यामुळे शेतकरी वर्गाला ही पिके चांगली परवडतात.

source : krushipandhari

Summer crops that bring guaranteed profits to farmers, zaid crop

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading