झाडाची मुळे म्हणजे निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन
10-04-2023

झाडाची मुळे म्हणजे निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन शेताच्या बांदावरील झाडांपासून होतात हे फायदे
- एक कडूनिंबाचे झाडं दहा हजार लिटर पाणी एकुण पावसाळ्यात जमिनीत घेऊन जाऊ शकते. याचा अर्थ आपल्या परिसरात किमान ३० झाडं निंब, चिंच, जांबळ, अंबा, मोह, अर्जुन या वर्गातील नक्कीच असतील. म्हणून मृत साठ्याचे पाणी पाझरत रहात असावे.
- एक वडाचे किंवा पिंपळाचे मोठे झाडं एका हंगामासाठी एक कोटी लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते. आणि ते ही पन्नास फुटाच्या ही खाली. वडाची व पिंपळाचे मुळे पाषाणालाही भेदून ८०० ते १००० फुटावर पोचतात.
- एक कोटी लिटर म्हणजे एका विहीरीचा शंभर वेळा उपसा करावा एवढे पाणी. याचा गणितीय हिशोब सांगायचा झाला तर ३५ एकर शेतीचे रब्बी हंगामाचे भरणपोषण होते आणि वर्षभर बागायतीसाठी १५ एकरला पुरेल एवढे जिवंत साठ्याचे पाणी एक वड किंवा पिंपळ पुरवतो.
- म्हणून आपल्या शेताच्या शेजारी मोकळी पडीक जागा असेल तर किमान एक असा महावृक्ष लावा.
- आपण एका बोअरवेलसाठी एक लाख खर्च करतो. एका विहीरीसाठी पाच लाख खर्च करतो. पण पाण्याची कुठलीच शाश्वती नाही.
त्यामुळे आपण असे आपल्या शेताच्या बांदावर झाडे लावले पाहिजेत.