भात लागवडीसाठी वापरा हे यंत्र, लागवड खर्च होईल कमी

10-05-2023

भात लागवडीसाठी वापरा हे यंत्र, लागवड खर्च होईल कमी

भात लागवडीसाठी वापरा हे यंत्र, लागवड खर्च होईल कमी 

भात लावणी यंत्राचे वॉकिंग टाईप आणि रायडींग टाईप असे दोन प्रकार आहेत. वॉकिंग टाईपमध्ये चालकास यंत्राच्या पाठीमागे चालावे लागते किंवा चालकास त्यास चालवावे लागते. रायडींग टाईप मध्ये चालकास यंत्रावर बसण्यासाठी सीट असते. हे यंत्र डिझेल/पेट्रोल इंजीनवर चालते. वॉकिंग टाईप भात पेरणी यंत्र वॉकिंग टाईप भात पेरणी यंत्रामध्ये मनुष्य चलित आणि डिझेल/पेट्रोल इंजीनवर चालणारे यंत्र असे प्रकार आहेत. यासाठी मुळे धुतलेली भाताची रोपे किंवा खास मॅट टाईप नर्सरी पद्धतीने तयार केलेली रोपे लागतात.

मानव चलित भात लावणी यंत्र 

  • यंत्राचा उपयोग कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना होतो. यंत्राची क्षमता हाताने लावणी करण्यापेक्षा जास्त आहे.
  • यंत्र चालवण्यासाठी चिखलणी करून पाण्याचा निचरा केलेली जमीन लागते.
  • रोप लावताना यंत्र ओढत उलटे चालावे लागते. मॅट टाईप नर्सरीमध्ये लावलेली २० ते २५ दिवसांची रोपे यासाठी वापरतात.
  • रोपे जमिनीमध्ये लावण्यासाठी चालकास यंत्राचे हॅंडल उचलून थोडा खाली दाबावा लागतो आणि पुन्हा पाठीमागे चालावे लागते.
  • यंत्राद्वारे एका दिवसामध्ये ०.१२ ते ०.२८ हेक्‍टर क्षेत्रावर लावणी करता येते.

हॅंड क्रेंकींग टाईप भात लावणी यंत्र

  • भाताची मुळे धुतलेली रोपे एका ओळीत लावण्यासाठी या यंत्राचा उपयोग होतो. एका ओळीत रोपांची लावणी केल्याने त्यामध्ये सायकल कोळपे किंवा इतर यंत्राने भांगलणी करणे सोपे जाते.
  • वाकून हाताने रोप लावणी करताना जो त्रास होतो, तो या यंत्रामुळे टाळता येतो.
  • यंत्राने एका दिवसामध्ये ०.२४ हेक्‍टर जमिनीमध्ये लावणी करता येते.
  • पॉवर ऑपरेटेड वॉक बिहाइंड टाईप भात लावणी यंत्र
  • रायडींग टाईप भात लावणी यंत्राची किंमत जास्त असते. तसेच वाकून हाताने रोप लावणी करणेही खूप त्रासाचे, वेळ घेणारे आणि खर्चिक असल्याने पॉवर ऑपरेटेड वॉक बिहाइंड टाईप भात पेरणी यंत्राचा वापर फायदेशीर ठरतो.
  • यंत्रासाठी मॅट टाईप नर्सरीची रोपे लागतात. ही रोपे ४० ते ५० मी.मी खोलीवर लावली जातात.
  • यंत्राने एका दिवसात ०.२८ ते ०.३६ हेक्‍टर जमिनीमध्ये रोप लावणी करता येते.
  • रायडींग टाईप भात लावणी यंत्र
  • रायडींग टाईप भात लावणी यंत्र एका किंवा चार चाकासोबत येते.
  • एका दिवसामध्ये १.२ ते १.६ हेक्‍टर शेतात भात रोपांची लावणी पुर्ण होते.
  • यंत्राने मॅट टाईप पद्धतीने तयार केलेली १४ दिवसांची रोपे लावता येतात. यंत्राच्या सहाय्याने रोप लावणी केल्याने वेळ, मनुष्यबळ आणि खर्चाची बचत होते.

 

bhat lagaved,yantrne

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading