Geranium : जिरेनियम म्हणजे काय?
07-09-2023

Geranium : जिरेनियम म्हणजे काय?
शेतकरी मित्रांनो जिरेनियम हे रांगड्या जातीचा पिकांपैकी एक झुडूपवर्गीय पीक आहे व हे एक सुगंधी पीक आहे. याचा वापर सुगंधी वस्तू बनविण्यासाठी होतो म्हणजेच परफ्यूम, अत्तर, पावडर इत्यादी. जिरेनियम या पिकाची परफ्यूम व कॉस्मेटिक्स इंडस्ट्री कडून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
Geranium : जिरेनियम बद्दल विशेष माहिती –
- जिरेनियम पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी किंवा मध्यम व उत्तम निचरा असलेली जमीन निवडावी.
- जिरेनियम या पिकाची वाढ पंचवीस ते तीस डिग्री तापमान असलेल्या वातावरणात चांगल्या प्रकारे होते.
- जेरेनियम हे पीक एकदा लावले की तीन वर्षापर्यंत या पिकातून आपण उत्पन्न घेऊ शकतो .
- एका वर्षांमध्ये तीन वेळा यांची कापणी करावी.
- जिरेनियम लागवडीसाठी किमान एकरी दहा हजार रोपे लागतात.
- जिरेनियम या पिकावरती खतांचा, कीटकनाशकांचा, बुरशीनाशकांचा खर्च फार कमी आहे त्यामुळे कमी खर्चामध्ये हे पीक शेतकऱ्यांना योग्य प्रकारे आणण्यास सोईस्कर जाते.
- जिरेनियम या पिकामध्ये शेवगा पीक आंतरपीक म्हणून घेऊ शकता.
- जिरेनियम या पिकापासून तेलाची निर्मिती होते व कापल्यानंतर उरलेल्या पाल्या पासून खत तयार करता येते.
- जिरेनियम पिकाची योग्य नियोजन असल्यास एकरी 40 टन उत्पन्न वर्षाला मिळते.
- एक टन पासून एक किलो तेल तयार होते असे 40 टनापासून 35 ते 40 किलो तेल तयार होते.
- एक किलो तेलाचा भाव सध्या दहा ते बारा हजार रुपये आहे.
- जिरेनियम या पिकास वार्षिक खर्च बघितला तर तो आपल्या नियोजनावर राहिला तरी एकरी रुपये कमीत कमी 40,000 व जास्तीत जास्त 80,000 खर्च येऊ शकतो.
Geranium : जिरेनियमची शेती का करावी?
- जिरेनियम ची शेती का करावी कारण कॉस्मेटिक व परफ्यूम इंडस्ट्री कडून या पिकास खूप मागणी आहे.
- मागणी जास्त आहे आणि लागवड कमी आहे त्यामुळे बाहेरच्या देशातून सुद्धा हे पीक मागवले जाते.
- दुष्काळी भागात सुद्धा जिरेनियम पिक व्यवस्थित पणे येऊ शकते व कमी खर्चा मध्ये चांगले उत्पन्न आपल्याला मिळू शकते.
महत्वाचे –
शेतकरी मित्रांनो तुम्हाला जिरेनियम पिकाची लागवड करायची असेल तर कृषी विद्यापीठातील सुगंधी व औषधी वनस्पती विभाग व कृषी विज्ञान केंद्र यांनी केलेल्या जिरेनियम च्या प्लॉटला नक्की भेट द्या या सोबतच अनुभवी शेतकऱ्यांच्या प्लॉट ला सुद्धा भेट द्या व योग्य नियोजन करून जिरेनियम पिकाची लागवड करा.
जिरेनियम किंवा आपल्या शेतीतील कोणतेही पिक कोठे विकायचे, मालाला चांगला भाव मिळेल कि नाही, याची चिंता असेल, तर चिंता करणं सोडून द्या. कारण आता आपण krushikranti.com वर आपल्या मालाची जाहीरात देऊ शकता, जाहिरात दिल्यानंतर लगेच आपल्याला खरीद दारांचे फोन यायला सुरुवात होईल आणि आपला माल चांगल्या भावात विकला जाईल.
krushikranti.com वरुन आपण जिरेनियमची रोपे खरेदी करू शकता.
source : digitalshetkari