पुण्यात पशुसंवर्धन पंधरवडा
06-08-2024

पुण्यात पशुसंवर्धन पंधरवडा
राज्यामधील पशुधनाच्या उत्पादक क्षमतेचा पुरेपुर वापर करून, पशुपालनापासून मिळणाऱ्या उत्पन्नाद्वारा राष्ट्रीय सकल उत्पादनात भर टाकण्याच्या हेतूने पशुपालकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी पुणे जिल्ह्यात १ ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत पशुसंवर्धन पंधरवडाचे आयोजन केले आहे.
पशुसंवर्धन पंधरवडा आयोजित करण्याचा मुख्य उद्देश उच्च उत्पादन क्षमता असलेल्या पशू वंशावळीची पैदास, पशुस्वास्थ, पशुखाद्य, पशुचारा व व्यवस्थापन या पंचसुत्रीची पशुपालकांमध्ये जागृती निर्माण करून त्यात पशुपालकांचा सहभाग वाढावा असा आहे.
यासाठी सर्व पशुवैद्यकीय दवाखाने, शासकीय कार्यालय, ग्रामपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समिती, आठवडे बाजार याठिकाणी जनजागृती कार्यक्रमांसोबतच वंध्यत्व तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
त्या प्रमाणे पशुपालक व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे, दुध अनुदान योजना राबविताना येणाऱ्या अडचणीचे निराकरण, पशुधनास सकस आहार देण्यासाठी प्रोत्साहन जनजागृती व नजिकच्या भविष्यात केली जाणारी पशुगणना इत्यादी विषयांवर पशुपालकांना मार्गदर्शन दिले जाणार आहे.