Soyabean Rate : पिवळ्या सोन्याचा दर 5000 पर्यंत पोहोचताच पुन्हा घसरणीवर, बाजारात नेमकं काय होत आहे?

16-12-2023

Soyabean Rate : पिवळ्या सोन्याचा दर 5000 पर्यंत पोहोचताच पुन्हा घसरणीवर, बाजारात नेमकं काय होत आहे?

Soyabean Rate: पिवळ्या सोन्याचा दर 5000 पर्यंत पोहोचताच पुन्हा घसरणीवर, बाजारात नेमकं काय होत आहे?

Soyabean Price Updates: सोयाबीनच्या किंमतीत घसरण सुरूच आहे. अकोला कृषी उत्पादन बाजार समितीत सोयाबीनचे दर दोन दिवसांत 255 रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

विदर्भात सोयाबीनच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. अकोला जिल्ह्यातील अकोला कृषी उत्पादन बाजार समितीत दोन दिवसांत सोयाबीनचे दर प्रति क्विंटल 255 रुपयांनी घसरले आहेत. किमान किंमत 4,300 रुपयांपासून कमाल किंमत 4,830 रुपये आणि सरासरी किंमत 4,650 रुपये आहे. सोयाबीनच्या किंमतीतील घसरणीमुळे आता असे दिसून येत आहे की शेतकरी घरी साठवलेले सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणत आहेत, याचा अर्थ आवक वाढली आहे.

अकोलाच्या बाजारपेठेत सोयाबीनची आवक दिवसागणिक वाढत आहे. 14 डिसेंबर रोजी 4,806 क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. आतापर्यंत शुक्रवारी 2,631 क्विंटल सोयाबीनची आवक झाले आहे. गेल्या पाच दिवसांत अकोला बाजारात 19,546 क्विंटल खरेदी करण्यात आली आहे. 13 डिसेंबर रोजी 5000 क्विंटल सोयाबीन आले आहे.

या हंगामात शेतकऱ्यांना सोयाबीन लागवडीचा लाभ घेता आलेला नाही. सोयाबीनचे दर वाढण्याची वाट पाहत असलेला शेतकरी आता चिंतेत आहे. सर्व बाजारपेठांमध्ये सोयाबीनचे दर घसरले.

क्विंटलमागे दोन दिवसात २५५ रूपयांनी सोयाबीन भाव कमी झालेत, त्यामुळे सोयाबीन भावात आणखी वाढ होण्याची शेतकऱ्यांना आशा राहली नाही. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच १३ डिंसेबर रोजी सोयाबीनला कमाल ५०८५ रूपये भाव होता. तर ,सरासरी भाव ४ हजार ७०० रूपये मिळाला होता. त्यानंतर पुन्हा सोयाबीन दरात घसरण सुरू झाली आणि काल साधारणतः सोयाबीनला कमीत कमी ४ हजार १०५ पासून जास्तीत जास्त ४ हजार ८६५ रूपयांपर्यत भाव मिळाला.

आज शुक्रवारी सोयाबीन दरात कमाल दरात ३५ रुपयांनी घसरण झाली असून किमान भाव ४ हजार ३०० ते कमाल भाव ४ हजार ८३० रूपये मिळाला. सरासरी दरात देखील ५० रुपयांनी घसरण झाली असून ४ हजार ६५० रूपयांवर आलाय. त्यामुळ अखेर नाईलाजाने दरवाढीच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजारात विक्रीसाठी आणावं लागत आहे.

🌱अशाच शेतीविषयक माहितीसाठी खालील लिंकवरून कृषी क्रांती व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा👇

https://chat.whatsapp.com/KhCCLMztU3Q3b9HurYDRkd

Soyabean Rate, soyabean bajarbhav

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading