Weather Update: महाराष्ट्रात येत्या दोन दिवसांत या भागांमध्ये पावसाची शक्यता.

03-11-2023

Weather Update: महाराष्ट्रात येत्या दोन दिवसांत या भागांमध्ये पावसाची शक्यता.

Weather Update: महाराष्ट्रात येत्या दोन दिवसांत या भागांमध्ये पावसाची शक्यता. 

महाराष्ट्रातील तापमानात घट होत असल्यामुळे गुलाबी थंडी सर्वत्र पडली आहे. याच कारणामुळे उन्हाच्या चटक्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. पहाटेच्या वेळी हवेत गारवा निर्माण होत आहे. मात्र राज्यातील तापमानात सध्या चढ उतार होताना दिसत असून राज्याच्या काही भागात येत्या दोन दिवसांमध्ये पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यात सकाळी सकाळी थंडी जाणवत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या हिटच्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरीही काही भागात दुपारी उन्हाची तीव्रता जाणवत आहे. तसंच नोव्हेंबर महिन्यात थंडी कमी राहण्याचा अंदाजही हवामान खात्याने दिलेला आहे, त्यासोबतच हवामान विभागाने काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

राज्याच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनूसार, येत्या दोन दिवसांत ‘सिंधुदूर्ग’ जिल्ह्यामधील काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस होवु शकतो. तसेच ‘रत्नागिरीमध्ये’ विजांसह काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात. त्याचबरोबर वारे प्रतितास ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहण्याचीही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पाऊस, महाराष्ट्रातील तापमान, गुलाबी थंडी, पावसाची शक्यता, महाराष्ट्र राज्य, weather update, rain update.

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading