कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाची हजेरी: खरीप पेरण्या सुरू…

10-06-2024

कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाची हजेरी: खरीप पेरण्या सुरू…

कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाची हजेरी: खरीप पेरण्या सुरू…

कोकण व मध्य महाराष्ट्रातील अर्ध्या भागात मॉन्सून व्यापल्यावर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश पाऊस झाला. तर कुडाळमध्ये सर्वाधिक १९७.३ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली. या पावसामुळे कोकणातील  भात रोपवाटिका, व  मध्य महाराष्ट्रातील खरीप पेरण्यांना सुरुवात करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.
या गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोकण व महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक आहे. अनेक ठिकाणी शंभर मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला. तर आंबोली येथे १७६.५, मसुरे १६९.३, सावंतवाडी १६४.८, बांदा १६४.८ सर्वाधिक पाऊस पडला. तर ठाणे, पालघर जिल्ह्यांत पावसाचा जोर काहीसा कमी होता. परंतु झालेल्या पावसामुळे खरीप कामांना वेगात सुरुवात झाली आहे.

मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नगर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक होता. शनिवारी (दि.८) सायंकाळी पाचच्या सुमारास मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. या सर्व जिल्ह्यात सर्वदूर वादळीवारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. बारामती, सणसर आणि पुणे शहरांत अक्षरशः ढगफुटीसदृश पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यांत पावसाचा जोर कमी होता. तर खानदेशातील अनेक भागात पावसाची अजूनही प्रतीक्षा चालू आहे.
मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशीव, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसाच्या हलक्या सरी पडल्या. अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली असून, ढगाळ वातावरणाची स्थिती कायम होती. मात्र, मागील दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे.

अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, मूग, उडीद या पिकांच्या पेरणीसाठी बियाणे, खतांची खरेदी केली आहे. विदर्भातील यवतमाळ, नागपूर, भंडारा या जिल्ह्यांत पावसाच्या तुरळक सरी पडल्या असून, अनेक ठिकाणी पावसाची अजूनही प्रतीक्षा लागून आहे. काही ठिकाणी ऊन पडल्याची स्थिती देखील होती.

मध्य महाराष्ट्र :

ठिकाणपाऊस (mm)
श्रीगोंदा५२.५
पेंडगाव७१
कर्जत५९
राशीन७४.८
भांबोरा८२.५
खडकवासला९१.३
थेऊर७१
वाघोली६२.८
नसरापूर८२.०
किकवी८६.८
आंबवणे८३.८
न्हावरा६७.५
उंडवडी६१.५
भिगवण८७.३
इंदापूर५९.३
काटी६३
निमगाव६५
रावणगाव७०.३
दौंड६९.३
बोरी बुद्रुक४३.८
खामगाव४८.८
वडगाव बांदे४६.५
पारगाव६७.५
मुस्ती८८.८
टाकळी५९.८
पेनूर६६.५
हातीद८४.८
सदाशिवनगर५९
दहिगाव६०.३
नातेपुते७९.३
पिलीव६७.८
आंधळगाव७०.८
मारापूर७०.८
नागठाणे९२
आंबवडे८९.८
तासगाव७०
अपशिंगे८९
केळघर६५.८
मसूर७३
उंडाळे५९.३
काले७८
रहिमतपूर७१.८
शिरंबे६७.८
वाठार-स्टेशन६६.८
औंध७४
वडूज९३
कातरखटाव८१.३
दहिवडी७०
मलवडी७२.८
गोंदावले७८.३
कुक्कुडवाड६९
मार्डी-
शिंगणापूर६३
फलटण७९
आसू६४
बरड८०.५
राजाळे६३.३
खंडाळा६०.३
जत९७.३
कोरेगाव६१.३
तांदूळवाडी६३.५
कासेगाव७८
मांजर्डे५९.३
शिरशी९१.८
दिघंची६४.५
आटपाडी९१.३
कडेगाव६९.८
शाळगाव५८.८
हेर्ले९६.३
हुपरी७८.८
रुई८५.८
कागल६४.३
खडकेवाडा६७
गडहिंग्लज६२.८
कडेगाव६२.८
पाटोदा४१.५
टाकलसिंघ४५.८
तेर्ला३१.५
नितरूड३३.५
रेणापूर३७.८
पानगाव३६.३
पळशी३३.३
धाराशिव शहर४३.३
कासेगाव३१.५
तुळजापूर३२.३
सालगारा५९.५
इतकल३५
नळदुर्ग५९.८
वालवड३२.५
मुरूम३२.३
माकणी३३.८
जवळा बाजार३७.३
धामनगाव२७.८
वेनी२६
कासोळा५०.५
बोरी२१.५
गोरेगाव२९.८
कुरोडी३९.५

weather forecast, panjab dakh, havaman, rain update, weather

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading