Crop Management : सध्याच्या अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितील पीक व्यवस्थापन

02-12-2023

Crop Management : सध्याच्या अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितील पीक व्यवस्थापन

Crop Management : सध्याच्या अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितील पीक व्यवस्थापन

तूर :

  • तुर पिक सध्या स्थितीत फुलोरा ते दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. अशा परिस्थितीतील फुलगळ टाळण्याकरिता सकाळी व सायंकाळी शेतात धूर करावा व तसेच बोरोन २० ग्रॅम किवा नॅप्थालिक असेटिक असिड (NAA) २.५ मिली प्रति १० लिटर या प्रमाणे फवारणी करावी.
  • तुर पिकामध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास खोडांवर व फांद्यांवर मेटॅलॅक्झिल  (४%) + मॅनकोझेब (६४%) २० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
  • मर रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास २ किलो ट्रायकोडर्मा चांगल्या कुजलेल्या २०० किलो शेणखतात मिसळून पिकात फेकावा.

कापूस :

  • पाऊस झालेल्या ठिकाणी भिजलेल्या कापसाची वेचणी कापूस वाळल्यानंतर करावी व वेचणी झालेला कापूस वेगळा साठवावा.
  • झाडावर असलेली बोंड लवकर परिपक्व होण्यासाठी १३:००:४५ ८० ते १०० ग्रॅम प्रति १० लिटर मधून फवारणी करावी.
  • बाह्य बोंडसड रोखण्यासाठी पायराक्लो स्ट्रोबीन २०% १० ग्रॅम किंवा प्रोपीकोणाझोल २५% १० मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी आणि अंतर्गत बोंडसड रोखण्यासाठी कॉपर ऑक्झीक्लोराईड ५०% २५ ग्रॅम प्रमाणे फवारणी करावी.

हरभरा :

  • ज्या ठिकाणी पाऊस जास्त झाला त्या ठिकाणी मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे अशा वेळी खबरदारी म्हणून २ किलो ट्रायकोडर्मा चांगल्या कुजलेल्या २०० किलो शेणखतात मिसळून पिकात द्यावा.
  • कापूस, तूर, हरभरा व तसेच इतर रब्बी  पिकात साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा चर खोदून निचरा करावा. 
  • पिकात पाणी सावून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

Crop Management, management, crop, toor, cotton, kapus, harbhara

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading