मिचाँग चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या हवामानावर काय परिणाम होणार?

04-12-2023

मिचाँग चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या हवामानावर काय परिणाम होणार?

Cyclone Michong : मिचाँग चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या हवामानावर काय परिणाम होणार?

  • बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाल्यामुळे पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.
  • महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे 4 लाख हेक्टरपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ परिसंचरणामुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
  • भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळ लवकरच आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र, भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) महाराष्ट्रावर चक्रीवादळाच्या प्रभावाची अद्याप कोणतीही पुष्टी केलेली नाही.
  • गेल्या 24 तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाची तीव्रता वाढली आहे आणि त्याचे रूपांतर मिचाँग नावाच्या चक्रीवादळात झाले आहे. हे चक्रीवादळ मंगळवारी (ता. ५) दुपारी नेल्लोर आणि मच्छलीपट्टणम दरम्यान दक्षिण आंध्र प्रदेशचा किनारा ओलांडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
  • वाऱ्याचा वेग ताशी 90 ते 100 किमी असून तो ताशी 110 किमी पर्यंत जाऊ शकतो. दरम्यान, दक्षिण ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ते आंध्र प्रदेशात तीव्र चक्रीवादळात रुपांतरीत होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाला म्यानमारने सुचवलेले मिचाँग हे नाव देण्यात आले आहे.
  • भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राला चक्रीवादळाचा कोणताही धोका नाही. मात्र, पुढील 3 ते 4 दिवसांत मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
  • मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात, तर विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Cyclone Michong, weather, havaman andaj, rain update

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading