ड्रॅगन फ्रुट लागवड तंत्रज्ञान
08-07-2023

ड्रॅगन फ्रुट लागवड तंत्रज्ञान
शेतकरी बंधूंनो नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण या लेखात ड्रॅगन फ्रुट लागवड तंत्रज्ञान याबद्दल माहिती घेणार आहोत.
ड्रॅगन फ्रुट हे निवडुंग या प्रकारात मोडणारे फळ आहे.
ही निवडुंग या प्रकारात मोडणारी वेल वनस्पती आहे. Cactaceae या कुळातील हे फळ आहे.
हे एक विदेशी फळ पीक असून संपूर्ण जगामध्ये याची लागवड केली जाते. हे फळ मुळचे उष्ण भागातील आहे या फळाचे मूळ हे मेक्सिको आणि दक्षिण अमेरिका आहे.
पाश्चात्त्य देशांमधील कंबोडिया थायलँड, तैवान, मलेशिया, व्हीएतनाम, फिलिपिन्स, इंडोनेशिया या देशांमध्ये या फळाची लागवड केली जाते.
हे फळ भारतातही बऱ्याच प्रमाणात प्रचलित आहे. भारतामधील महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तमिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये या फळाची लागवड केली जाते.
या फळाखाली असणारे क्षेत्रफळ भारतामध्ये शंभर एकर पेक्षा कमी आहे.
उत्कृष्ट दर्जाची फळे ही लंडन, मलेशिया, व्हिएतनाम आणि श्रीलंका या देशातून आयात केली जातात.
हायलोसेरेयस(hylocereus)ही ड्रॅगन फ्रुट ची महत्वाची प्रजाती आहे.
या फळाची वेल छत्री प्रमाणे असते .या फळाची वेल असल्यामुळे वेलवर्गीय पिकांप्रमाणे त्याला आधाराची गरज असते.
या वेलवर्गीय पिकाचे आयुष्य हे 15 ते 20 वर्षे एवढे असते.
ड्रॅगन फ्रुट चा उपयोग
- मधुमेह, कर्करोग, संधिवात, दमा या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ड्रॅगन फ्रुट चा वापर केला जातो.
- ड्रॅगन फ्रुट मूळे शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
- अन्न पचन करण्याची क्षमता वाढते .
- ड्रॅगन फ्रुट फळांमध्ये जीवनसत्वे खनिजे व प्रथिने हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात त्यामुळे योग्य प्रमाणात शरीराला पोषण तत्त्वे मिळतात.
- हे फळ प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते. या फळापासून जॅम, आइस्क्रीम, जेली, वाइन बनवली जाते.
- फेस पॅक मध्ये देखील या फळाचा वापर केला जातो. 7.मलेरिया आणि डेंग्यू झालेल्या पेशंटला हे फळ खायला दिले जाते.
- या फळांमुळे रोगप्रतिकारक शक्ती व पांढऱ्या पेशी वाढायला मदत होते
हवामान
या फळासाठी उष्णकटिबंधीय तापमान आवश्यक असते. अशा उष्ण भागांमध्ये हे पीक उत्तम येते. साधारण 20 ते 30℃ तापमान योग्य असते. जास्त प्रमाणात सूर्यप्रकाश या पिकास लाभदायी असतो. 100 ते 150 सेंटिमीटर पाऊस पिकाच्या वाढीस योग्य असतो .<br>जास्त प्रमाणात पाऊस धुके व दमट वातावरण या पिकास हानिकारक ठरते .
तसेच जर जास्त प्रमाणात पाऊस झाला तर फूल व फळांची गळ होते.
जमीन
साधारणतः सगळ्या प्रकारच्या जमिनीत हे पीक घेता येते. पण पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन या पिकासाठी पूरक असते. सेंद्रिय कर्ब असलेली चिकनमाती या पिकासाठी खूप लाभदायी ठरते. साधारण जमिनीचा सामू हा 5.5 ते 7.5 असावा.
जातीवरून या फळाचे तीन प्रकार पडतात ते खालील प्रमाणे आहेत-
- वरून लाल व आतील गर पांढरा रंगाचा
- वरून लाल रंग व आतील गर देखील लाल.
- पिवळा रंग व आतील गर पांढरा.
अभिवृद्धी
या वेलवर्गीय फळपिकांची अभिवृद्धी ही कटिंगस किंवा बियापासून देखील केली जाते. परंतु जर आपण बियापासून उगवण केली तर प्रत्येक झाडांमध्ये वेगळेपणा दिसून येतो. म्हणून व्यावसायिक दृष्ट्या जर तुम्ही हे पीक घेणार असाल तर कटिंगस ने अभिवृद्धी करणे कधीही योग्य.
जमिनीची मशागत
जमीन 2 ते 3 वेळा नांगरून चांगली भुसभुशीत करून उन्हात तापवून घ्यावी. या झाडांना आधार देण्यासाठी सिमेंटचे पोल उभारावेत. हे पोल 12 सेंटीमीटर रुंद आणि 2 मीटर उंच असावेत. एका हेक्टरसाठी 1200ते 1300 पोल उभारावे.<br>दोन झाडांमधील व दोन ओळींतील अंतर हे 3*3 मीटर असावे.<br>उत्पन्न वाढीसाठी व आरोग्यदायी फळे मिळवण्यासाठी 45 ते 50 सेंटिमीटर उंच असलेली रोपे वापरावी .<br>जर ही रोपे दोन ते तीन वर्ष जुनी असतील तर उत्तमच. जून-जुलैमध्ये या पिकाची लागवड करावी. एका पोल ला चार रोपे या प्रमाणे लागवड करावी.
पाणी व्यवस्थापन
ड्रॅगन फ्रुट हे फळ उत्तम पाण्याचा ताण सहन करणारे पीक आहे. काही आठवड्यापासून ते महिन्यांपर्यंत हे पीक पाण्याचा ताण सहन करू शकते .या पिकाला खूप कमी पाणी लागते.
फळधारणेच्या वेळी आठवड्याला दोन वेळेस पाणी देणे आवश्यक ठरते .तीव्र उन्हाळ्यामध्ये रोज प्रति झाड एक ते दोन लिटर पाणी द्यावे.
खत व्यवस्थापन
सुरुवातीच्या काळात उत्तम वाढीसाठी नत्र हे जास्त प्रमाणात देणे गरजेचे असते. परंतु नंतरच्या काळामध्ये स्फुरद व पालाशची मात्रा देखील वाढवून द्यावी.
छाटणी
लागवडीपासून 2 वर्षानंतर छाटणी करावी. रोगट व वाकड्या-तिकड्या वाढलेल्या फांद्याची छाटणी करावी. 3 वर्षानंतर झाडाला छत्री सारखा आकार द्यावं. छाटणी केल्यानंतर छाटलेल्या फांदीला बुरशीनाशक लावा.
रोग व किड व्यवस्थापण
या पिकावर किड व रोगांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो पिठ्या ढेकूण काही प्रमाणत आढळतो. त्याच्या नियंत्रनाससाठी नुवान 1.5 मी.ली. प्रती लिटर प्रमाणे फवारणी करावी
काढणी
लागवड झाल्यानंतर 18-24 महिन्यानंतर फळ यायला सुरुवात होते. फुलोरा आल्यावर 30-50 दिवसात फळ परिपक्व होते. फळाचा रंग हा अपरिपक्व अवस्थेमध्ये हिरवा असतो नंतर तो परिपक्व अवस्थेत लाल किंवा गुलाबी होतो. फळ लागण्याचा कालावधी हा 3-4 महिने असतो. या कालावधीमध्ये फळाची काढणी 3-4 वेळेस होते.
source : shetisamruddhi