निलगिरी लागवड तंत्रज्ञान

04-08-2023

निलगिरी लागवड तंत्रज्ञान

निलगिरी लागवड तंत्रज्ञान

निलगिरी झाडांची लागवड फायदेशीर, मिळणार लाखोचे उत्पन्न ! 

निलगिरी हे झाड सदाहरीत असून सरळ व जलद वाढणारे आहे. हे झाड मूळचे ऑस्ट्रेलियातील आहे. याचे फळ मिरटेशिया आहे. निलगिरी वृक्षाच्या 140 पेक्षा जास्त प्रजाती आहेत. भारतात 1843 च्या काळात या वृक्षाची निलगिरी पर्वत रांगेत प्रथमत: लागवड लावण्यात आली. भारतात निलगिरीच्या 16 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. निलगिरीचा पर्णभार म्हणजे शाखा विस्तार फारच माफक असतो. त्यामुळे खोड सरळ व जास्त लांबीचे असते. हा वृक्ष कृषीवनिकी पद्धतीमध्ये लावण्यास योग्य आहे. या वृक्षात 47 अंश सेल्सिअस पर्यंत अधिकतम तापमान व तीन अंश सेल्सिअस न्यूनतम तापमान सहन करण्याची क्षमता आहे. त्याच्या वाढीसाठी 600 ते 1800 मिमी सरासरी पर्जन्यमानाची आवश्यकता असते.

जमीन व हवामान : निलगिरी वृक्षाच्या लागवडीसाठी कोणत्याही प्रकारची वरकस, मुरमाड, रेताड काही प्रमाणात क्षारयुक्त जमीन चालते. खोल व उत्तम निचर्‍याच्या जमिनीत निलगिरीची वाढ फारच झपाट्याने होते. पावसाळ्यानंतर सिंचनाची सोय असल्यास निलगिरीचे झाड हवामानातील बदलास न जुमानता वाढ शकते. निलगिरीच्या वाढीसाठी प्रखर सूर्यप्रकाशाची गरज असते. या वृक्षात फुटवे फुटण्याची फार जास्त क्षमता असल्याने एकदा लागवड केल्यानंतर चार ते पाच वेळा तोडणी करून रोपवनांचे पुनरूज्जीवन खोडवा पद्धतीने तयार करता येते.

रोपवाटिका तंत्रज्ञान : निलगिरीची रोपवाटिका तयार करण्यासाठी कसदार, पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी. बारमाही व हंगामी तणांचा त्रास असणारी जागा निवडू नये. रोपवाटिकेची जागा रस्त्याच्या जवळ, बारमाही पाण्याची सोय असलेली, प्रखर सूर्यप्रकाश व वादळापासून रोपे सुरक्षित रहातील व जनावरांचा उपद्रव होऊ नये म्हणून कुंपण असलेली असावी. निवडलेली जागा एका फुटापर्यंत नांगरून ढेकळे फोडून भुसभुशीत करावी. जमिनीचा उतार पाहून व काम करण्यास योग्य असे गादी वाफे करावे व गादी वाफ्यावर चांगले कुजलेले शेणखत पसरावे.

निलगिरी वृक्षाची फळे जानेवारी ते मार्च दरम्यान तयार होतात. फळे पूर्ण पक्व होण्याच्या थोडे अगोदर गोळा करावी व सावलीत पसरून ठेवावी. एक ते दोन दिवसात फळे उघडून आतील ‘बी’ बाहेर पडते. हे बियाणे तीन ते सहा महिन्यापर्यंत साठवण करता येते. रोपवाटिकेसाठी शक्यतो ताजे बियाणे वापरावे. रोपवाटिका जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत करता येते. निलगिरीचे बियाणे फार लहान असल्याने गादी वाफ्यावर टाकण्याअगोदर बारीक माती किंवा राखेमध्ये मिसळून घ्यावे. बियाणे गादीवाफ्यावर टाकल्यानंतर त्याच्यावर झाकण्यासाठी बारीक रेतीचा थर द्यावा. पाणी देताना बियाणे जागेवर रहावे यासाठी वाफ्यावर वाळलेले गवत अथवा पाचट पसरावे. ‘बी’ पेरल्यानंतर तीन ते चार दिवसात उगवण सुरू झाल्यानंतर गवत हलक्या हाताने अलगद काढावे. निलगिरीची रोपे नाजूक व लहान असल्याने सकाळ-संध्याकाळ गरजेनुसार झारीने वाफ्यावर पाणी द्यावे.

लागवड व व्यवस्थापन : रोपे 10 ते 15 दिवसात चार ते पाच पानांची झाल्यावर अलगद काढून पॉलिथीन पिशवीमध्ये पुनर्लागवड करावी लागते. पुनर्लागवडीनंतर पिशव्या आठ ते दहा दिवस सावलीत ठेवून त्या नंतर मोकळ्या जागेत अथवा शेडनेट मध्ये ठेवाव्या. पुनर्लागणीसाठी 20 बाय 14 सें.मी. आकाराच्या 200 गेजच्या पिशव्या वापराव्यात. रोपवाटिकेत रोपे उगवण झाल्यानंतर अथवा पुनर्लागण केल्यानंतर पिवळी पडू लागल्यास 20 ग्रॅम फेरस सल्फेट 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

निलगिरीच्या लागवडीसाठी निरोगी बळकट, खोड व मुळांची योग्य वाढ झालेली तसेच 30 ते 40 सें.मी. उंचीची सहा ते आठ महिन्यांची रोपे निवडावीत. निलगिरीच्या लागवडीसाठी 2 बाय 2, 3 बाय 3 किंवा 2 बाय 3 मिटर अंतर योग्य आहे. प्रत्येक झाडाला चांगल्या वाढीसाठी कमीत कमी तीन ते चार चौरस जागा असावी. उन्हाळ्यात 30 बाय 30 बाय 30 सें.मी. आकाराचे खड्डे खोदावेत. खड्डे भरताना प्रत्येक खड्ड्यात 25 ते 30 ग्रॅम मिथील पॅराथिऑनची पावडर मिसळावी. पावसाळ्याच्या सुरूवातीस चांगली ओल झाल्यानंतर रोपांची लागवड करावी.

जाती : जगात निलगिरी वृक्षाच्या 140 पेक्षा जास्त प्रजाती आहेत. भारतात निलगिरीच्या 16 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. त्यापैकी युकॅलिप्टस, कमांड्युसिस, सिट्रीडोरा, ग्लोब्युलस, ग्रॅडीस व ट्रेरीटोकॉर्नीस या जाती कोरडवाहू तसेच दुष्काळाला प्रतिकारक जाती आहेत.

फुले आणि फळे : नीलगिरीच्या प्रजातींची सर्वात सहज ओळखता येणारी वैशिष्ट्ये म्हणजे विशिष्ट फुले आणि फळे (कॅप्सूल किंवा "गमनट"). फुलांमध्ये असंख्य पुंकेसर असतात जे पांढरे, मलई, पिवळे, गुलाबी किंवा लाल असू शकतात; कळीमध्ये, पुंकेसर एका टोपीमध्ये बंदिस्त असतात ज्याला ऑपरकुलम म्हणतातजो फ्युज्ड सेपल्स किंवा पाकळ्या किंवा दोन्ही बनलेला असतो. अशाप्रकारे, फुलांना पाकळ्या नसतात, परंतु त्याऐवजी ते स्वतःला अनेक आकर्षक पुंकेसरांनी सजवतात. पुंकेसराचा विस्तार होताना, ओपरकुलम जबरदस्तीने बंद केला जातो, फुलांच्या कपासारख्या पायापासून दूर होतो; हे एक वैशिष्ट्य आहे जे वंश एकत्र करते. वृक्षाच्छादित फळे किंवा कॅप्सूल साधारणपणे शंकूच्या आकाराचे असतात आणि त्यांच्या शेवटी व्हॉल्व्ह असतात जे बिया सोडण्यासाठी उघडतात, जे मेणासारखे, दांडाच्या आकाराचे, सुमारे 1 मिमी लांबीचे आणि पिवळ्या-तपकिरी रंगाचे असतात. प्रौढ पाने दिसू लागेपर्यंत बहुतेक प्रजाती फुलत नाहीत; ई. सिनेरिया आणि ई. पेरिनियाना हे उल्लेखनीय अपवाद आहेत. 

eucalyptus-fragrant-eucalyptus-flowers

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading