Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात तापमानामध्ये चढ  उतार.

02-11-2023

Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात तापमानामध्ये चढ  उतार.

Maharashtra Weather Forecast : महाराष्ट्रात तापमानामध्ये चढ उतार. 

महाराष्ट्र राज्याच्या कमाल आणि कमान तापमानाच चढ-उतार सुरू आहे. राज्याच्या उत्तरेकडील भागात गारठा जाणवत आहे. तर दक्षिणेकडे मात्र अद्याप जोरदार थंडीची प्रतिक्षा आहे. आज दिनांक २  राज्याच्या तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात उन्हाचा चटका वाढल्यानंतर अखेरच्या टप्प्यात कमाल तापमानात घट झाली. महाराष्ट्रातील काही  भागात किमान तापमान कमी झाल्याने थंडीची चाहूल लागली. बुधवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील सांताक्रूझ येथे ३६.३ तर डहाणू येथे ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात कमाल तापमानाचा पारा सातत्याने ३१ ते ३५ अंशाच्या दरम्यान आहे.

उत्तर महाराष्ट्रातील गारठा कायम असला तर उर्वरित राज्यात मात्र थंडीची प्रतिक्षा आहे. बुधवारी (ता. १) जळगाव येथे राज्यातील नीचांकी ११.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. निफाड, छत्रपती संभाजीनगर, पुणे वगळता उर्वरित राज्यात तापमानाचा पारा १५ अंशांच्या वरच आहे.

तारीख ०१ नोव्हेंबर बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

गडचिरोली ३२.२ (१६.४), जळगाव ३३.२ (११.०), कोल्हापूर ३१.३ (१९.६), महाबळेश्वर २६.१ (१५.९), नाशिक ३१.९ (१५.४), निफाड ३२.२ (१३.८), वाशीम ३२.६(१६.४) यवतमाळ ३२.२ (१५.५), सांगली ३२.४ (१९.३), पुणे ३१.२ (१४.९), सातारा ३२.५ (१६.६), सोलापूर ३५.४ (१७.६), सांताक्रूझ ३६.३ (२२.५), डहाणू ३६.० (२१.६), नांदेड - (१८.२), परभणी - (१५.९), अकोला ३३.६ (१८.१), अमरावती ३२.२ (१८.३), बुलढाणा ३२.० (१७.४), ब्रह्मपूरी ३४.७ (२०.०), चंद्रपूर ३०.८(१८.०), गोंदिया ३१.६ (१७.४), नागपूर ३१.५ (१८.४), वर्धा ३१.५(१८.४),रत्नागिरी ३५.९ (२३.०), छत्रपती संभाजीनगर ३२.६ (१४.४).  

temperature fluctuations, महाराष्ट्रातील तापमान, महाराष्ट्राचे तापमान.तापमानातील चढ-उतार.

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading