Goat Farming : शेळीपालनाबद्दल सविस्तर माहिती

25-12-2023

Goat Farming : शेळीपालनाबद्दल सविस्तर माहिती

Goat Farming : शेळीपालन करण्याअगोदर जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी 

शेळीपालन हा शेती पूरक व्यवसाय असून कमी भांडवल व कमी जागेत हा व्यवसाय करता येण्यासारखा आहे. ज्यांना इतर जनावरांपेक्षा जसे की गाय,म्हैस या पेक्षा खूप कमी प्रमाणात खाद्य लागते. जर आपण विचार केला तर एका गाईला लागणाऱ्या खाद्यामध्ये दहा शेळ्या जगू  शकतात.

त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हा व्यवसाय अत्यंत फायदेशीर आहे. शेळीपालनामध्ये बंदिस्त शेळीपालन हा शेळीपालनाचा एक प्रकार फार महत्त्वाचा आहे. यामध्ये शेळ्यांना त्यांना लागणारा चारा त्यांच्या गोठ्यामध्ये पुरवला जातो. या लेखात आपण बंदिस्त शेळी पालनाचे फायदे जाणून घेणार आहोत.

बंदिस्त शेळी पालनाचे फायदे

  • शेळी आकाराने लहान असल्यामुळे जागा कमी लागते. त्यामुळे जागेचा व बांधकामास खर्च कमी येतो. 
  • शेळी हा प्राणी कळपात राहत असल्यामुळे कळपाची वाढ झपाट्याने होते व लहान कळप घरातील स्त्रिया व मुले सहजपणे सांभाळू शकतात. त्यामुळे मजुरीचा खर्च वाचतो. 
  • शेळी हा प्राणी अत्यंत काटक आहे व बंदिस्त जागेत शास्त्रीय पद्धतीने त्याचे संगोपन केल्यास रोगराईचे प्रमाण कमी होते.
  • औषध उपचारावरील खर्च कमी होतो. मरतुक कमी होते व त्याचमुळे फायद्यात वाढ होते. 
  • शेळ्यांसाठी कुठल्याही प्रकारची किमती खाद्य लागत नाही. 
  • शेतातील काही टाकाऊ पदार्थांपासून शेळीचे खाद्य तयार करता येते. त्यामुळे खाद्याचा खर्च कमी होतो. 
  • शेळ्या चारायला सोडल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते. तसेच जंगलातील झाडेझुडपे यांचे नुकसान होते. तसेच शेळीला जखम व्हायची शक्यताही वाढते. हे सगळे नुकसान टाळण्यासाठी शिवरायांचे बंदिस्त शेळीपालन हा प्रकार फायदेशीर आहे.
  • आपल्या देशांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे हवामान असल्यामुळे गोठा बांधण्याच्या ठिकाणी त्या त्या भागातील हवामान पोटातील वायू विसर्जनाचा विचार करून बांधकामाच्या साहित्य निवडावे. 
  • बांधकाम करताना वापरासाठी स्थानिक व सर्वसाधारण उपलब्ध असलेल्या साहित्याची निवड करावी.शेतातील टाकाऊ पदार्थ, गव्हाचे काड किंवा भाताचे काड, ज्वारी बाजरीचे कांड, सिमेंट पत्रे, लोखंडी पत्रे यांचा वापर करावा. 
  • सर्वसाधारणपणे सूर्यप्रकाश व पावसापासून संरक्षण होईल अशा प्रकारचे छप्पर निवडावे.
  • गोठा पूर्व पश्चिम दिशेत बांधावा. गोठ्यामध्ये शुद्ध हवा सतत खेळती राहावी. त्यामुळे गोठ्यातील उष्णता, कार्बन वायू, धूळ, आद्रता गोठा बाहेर पडण्यास मदत होते. म्हणूनच गोठा बांधतांना त्याच्या मध्यावर उंची जितकी जास्त करता येईल तितकी ठेवावी. सर्वसाधारणपणे 15 ते 18 फूट उंची ठेवावी. 
  • शेळ्यांना सतत कोरडी जमीन उपलब्ध होईल याकडे लक्ष देण्यात यावे. तसेच मलमूत्र स्वच्छ करता येण्याजोगी जमीन ठेवावे.
  • व्यायामासाठी शेळ्यांना सर्वसाधारणपणे तेवढ्याच जागेची आवश्यकता असते. ही जागा गोठ्याच्या एका बाहेरच्या बाजूला ठेवावी. त्यावर छप्पर बांधायची गरज नाही.
  • गोठ्याच्या अवतीभवती सावलीसाठी मोठी झाडे लावावीत. खाद्य देण्यासाठी एका बाजूला लाकडी फळ्यांचा वापर करून करून गव्हाण तयार करावे. गव्हाणामध्ये शेळ्या आत जाऊन खाद्याची नासाडी करू नये म्हणून आडव्या बांबूचा उपयोग करावा. दुसऱ्या बाजूला जवळपास तीन फूट उंचीवर हिरवा चारा बांधावा. 
  • अशी व्यवस्था केल्यास शेळ्यांच्या नैसर्गिक सवयीप्रमाणे त्यांना हिरवा चारा खायला मिळून त्यांना मानसिक समाधान लाभते.
  • पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शक्यतो बाहेरील मोकळ्या जागेतच करावी. शक्य असल्यास बोकड व करडे यासाठी वेगळा गोठा बांधावा.
  • बोकडांचा गोठा मुक्त गोटा पासून लांब अंतरावर बांधावा. जेणेकरून शेळीच्या दुधास येणारा विशिष्ट वास थांबवता येईल. 
  • हिरवा चारा देण्यासाठी दुसऱ्या पद्धतीनुसार जमिनीपासून तीन फुटांवर लाकडाचा उपयोग करून रॅक तयार करावेत.
  • ओला चारा टाकण्यात यावा. त्यात दोन इंसा मधून आतील चारा बाहेर डोकावेल व शेळ्या दोन पायांवर उभे राहून चारा खातील अशा प्रकारचे लाकडी पिंजरे लावल्यानंतर शेळ्यांना त्यांच्या नैसर्गिक सवयीप्रमाणे खाद्य खाण्यास पोषक वातावरण निर्माण होईल.
  • बंदिस्त जागेमध्ये शेळ्यांची वेगवेगळ्या प्रकारात विभागणी करता येते त्यामुळे शेळ्यांना वयोमानाप्रमाणे खाद्य देता येईल व खाद्याची नासाडी होणार नाही. 
  • शेळ्या एकत्र ठेवल्यास लहान शेळ्यांना मोठ्या शेळ्या खाद्य खाऊ देत नाहीत. त्यामुळे त्यांची वाढ खुंटते व आपणास आर्थिक तोटा होतो.हा तोटा टाळला जाऊ शकतो.

हे हि पहा : महाराष्ट्रभरातील जनावरे खरेदी - विक्री ची माहिती येथे पहा

टीप : अशाप्रकारे शेतीविषयक महत्त्वाची माहिती, हवामान अंदाज तसेच दररोजचे ताजे बाजारभाव आपल्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी तुमच्या जिल्ह्याच्या whatsapp ग्रुपला जोडले जा येथे क्लिक करा

🌱अशाच शेतीविषयक माहितीसाठी खालील लिंकवरून कृषी क्रांती व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा👇

https://chat.whatsapp.com/KhCCLMztU3Q3b9HurYDRkd

source : krishijagran

Goat Farming, shelipalan, sheli, sheti jodhanda, sheti vyavasay, pashudhan, pashupalan, shelipalan vyavsay

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading