गहू दरवाढ कमी करण्यासाठी सरकारने घेतला मोठा निर्णय

30-03-2024

गहू दरवाढ कमी करण्यासाठी सरकारने घेतला मोठा निर्णय

गहू दरवाढ कमी करण्यासाठी सरकारने घेतला मोठा निर्णय, एका क्लिकमध्ये जाणून घ्या

सध्या गव्हाचे दर वाढत आहेत. महागाईला आळा घालण्यासाठी सरकार पावले उचलत आहे. गहू आणि तांदळाच्या साठ्यावर सरकार लक्ष ठेवून आहे.

हे ही पहा ; आजचे गहू बाजारभाव 

सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशा परिस्थितीत सरकार कोणत्याही प्रकारे महागाई रोखण्याचा प्रयत्न करत आहे. निवडणुकांच्या वेळी सामान्य लोकांना कमी दरात वस्तू मिळाव्यात यासाठी सरकार विविध निर्णय घेत आहे. गव्हाचे दर वाढत आहेत. महागाईला आळा घालण्यासाठी सरकार पावले उचलत आहे. गहू आणि तांदळाच्या साठ्यावर सरकार लक्ष ठेवून आहे. गहू साठवून ठेवू नये आणि साठवणुकीची सर्व माहिती सरकारला देणे बंधनकारक आहे, असा निर्णय घेण्यात आला आहे.

गव्हाच्या किंमतीत वाढ होऊ नये म्हणून सरकारने गव्हाच्या साठ्यावर मर्यादा घातली होती. या साठा मर्यादेची मुदत 31 मार्चला संपत आहे. त्यामुळे गव्हाचे दर वाढण्याची शक्यता आहे. अशातच सरकारनं साठा जाहीर करण्याचे आदेश दिले आहे. याबाबत ग्राहक व्यवहार आणि अन्न पुरवठा मंत्रालयानं या संदर्भात परिपत्रक जारी केले आहे. 

 

gahu, wheat, gahu bajarbhav, ajache bajarbhav

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading