विहीर खोदण्यासाठी सरकार देणार आर्थिक अनुदान
06-03-2024

विहीर खोदण्यासाठी सरकार देणार आर्थिक अनुदान
महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना सिंचनाच्या जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी आर्थिक अनुदान उपलब्ध करून देणे.
पावसाच्या अनियमिततेमुळे राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पिकाच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नाही व पाण्याअभावी शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते याचा मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. त्यामुळे शेतीपिकांच्या सिंचनासाठी विहिरींमधून पाण्याची उपलब्धता केली जाऊ शकते परंतु विहीर खोदण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची गरज असते व राज्यातील बहुतांश शेतकरी हे आर्थिक दृष्ट्या गरीब आहेत त्यामुळे पैशांअभावी शेतकरी शेतात विहीर खोदण्यासाठी असमर्थ असतात. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या या समस्येचा विचार करून राज्य शासनाने राज्यात पंचायत समिती विहीर योजना सुरु करण्याचा एक महत्वाचा निर्णय हाती घेतला.
महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना सिंचनाच्या जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी आर्थिक अनुदान उपलब्ध करून देणे हा Magel Tyala Vihir चा मुख्य उद्देश आहे. (मागेल त्याला विहीर योजना)
मागेल त्याला विहीर या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार विहीर खोदण्यासाठी सरकार मार्फत 4 लाख रुपये अनुदान. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर विहीर खोदायची असेल तर तुम्ही देखील मागेल त्याला विहीर या योजने अंतर्गत सरकारकडून 4 लाख रुपये अनुदान मिळवू शकतात. तरी आज आपण, या लेखात मागेल त्याला विहीर या योजनेचा अर्ज मोबाईलवर ऑनलाइन कसा भरायचा ? या विषयावर चर्चा करणार आहोत.
आम्ही Vihir Yojana ची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे कृपया करून तुम्ही हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा तसेच तुमच्या परिसरात असे कोणी शेतकरी असतील जे त्यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी इच्छुक असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेअंतर्गत अर्ज करून शेतात विहीर खोदून शेती पिकांच्या सिंचनासाठी पाण्याचा उपलब्धता करू शकतील.
योजनेचे नाव | विहीर योजना 2024 |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | कृषी विभाग |
लाभ | 4 लाख रुपये अनुदान |
उद्देश्य | शेतात विहीर खोदण्यासाठी आर्थिक अनुदान |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन/ऑफलाईन |
मागेल त्याला विहीर या योजनेचा अर्ज कसा भरायचा ?
मित्रांनो प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोअर ॲप उघडायचे आहे व सर्च करायचे आहे maha egs सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर MAHA-EGS Horticulture Well App या नावाचा ॲप येईल.
- आता तुम्हाला मोबाईल मध्ये हे ॲप इन्स्टॉल करायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये हे ॲप उघडायचे आहे.
- ॲप उघडल्यानंतर तुमच्यासमोर लाभार्थी लॉगिन असा पर्याय येईल.
- त्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्या समोर तीन पर्याय येतील.
- त्यापैकी तुम्हाला (विहीर) अर्ज या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्या समोर मागेल त्याला विहीर या योजनेचा अर्ज उघडेल.
- अर्ज उघडल्यानंतर त्या अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला भरावी लागेल.
- अर्ज भरल्यानंतर शेवटी तुम्हाला अर्ज जमा करा या पर्यावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला ओटीपी विचारला जाईल ते ओटीपी तुम्हाला टाकायचा आहे.
- त्याखाली तुम्हाला प्रस्तुत करा असा पर्याय दिसत असेल, त्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर अर्ज यशस्वीरीत्या भरण्यात आला आहे, असा मेसेज येईल.
शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या मोबाईल वरून ऑनलाईन पद्धतीने मागेल त्याला विहीर या योजनेचा अर्ज भरू शकता.