सरकारी पोर्टलवर नोंदणी करून मिळवा हमीभाव! मका उत्पादकांसाठी खास योजना…!

12-04-2025

सरकारी पोर्टलवर नोंदणी करून मिळवा हमीभाव! मका उत्पादकांसाठी खास योजना…!

सरकारी पोर्टलवर नोंदणी करून मिळवा हमीभाव! मका उत्पादकांसाठी खास योजना…!

बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत शेतकरी योजना महाराष्ट्र अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या रब्बी हंगाम २०२४-२५ साठी हमीभावाने मका खरेदी प्रक्रिया सुरू झाली आहे. मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी असून ऑनलाइन नोंदणी करण्यासाठीची मुदत २ एप्रिल ते ३० एप्रिल २०२५ अशी निश्चित करण्यात आली आहे.

या उपक्रमाची अंमलबजावणी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड यांच्या वतीने करण्यात येत आहे. शासकीय मका खरेदी वेब पोर्टल वरुन नोंदणी करून शेतकरी हमीभाव खरेदी केंद्राचा लाभ घेऊ शकतात.

(टीप: सर्व शेतमालाचे जिल्ह्यानुसार व सर्व बाजार समितीचे बाजारभाव खालील लिंक वर पाहायला मिळतील👇🏻)
https://www.krushikranti.com/bajarbhav

शेतकऱ्यांनी काय करावे?

पुणे आणि बारामती जिल्ह्यातील मका उत्पादकांनी नोंदणी करून केंद्र शासनाने निश्चित केलेल्या ₹२,२२५ प्रति क्विंटल हमीभावाचा लाभ घ्यावा. यासाठी बाबालाल काकडे निरा कॅनॉल संघ, तीन हत्ती चौक, बारामती येथे ऑनलाइन नोंदणी केंद्र उपलब्ध आहे.

समितीचे सभापती विश्वास आटोळे व उपसभापती रामचंद्र खलाटे यांनी सर्व शेतकऱ्यांना वेळेत नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, निरा संघाचे चेअरमन सतीश काकडे यांनीही दिलेल्या अंतिम तारखेपूर्वी नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे:

  • नोंदणी करताना शेतकऱ्यांनी खालील कृषी कागदपत्रे सादर करावीत:
  • ७/१२ उतारा (जमिनीवर मक्याची नोंद असलेला)
  • सन २०२४-२५ साठीचा पिकपेरा (आठ अ)
  • आधारकार्ड
  • बँकेचे पासबुक झेरॉक्स (IFSC कोडसहित)
  • मोबाइल नंबर

मका खरेदी, हमीभाव नोंदणी, government scheme, शेतकरी लाभ, रब्बी हंगाम, नोंदणी प्रक्रिया, maka bajarbhav, market rate, किमान दर, कृषी योजना, ऑनलाईन अर्ज, सरकारी अनुदान, बारामती बाजार, अनुदान कागदपत्र, IFSC कोड, पासबुक झेरॉक्स

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading