Heavy rain : राज्यात उद्यापासून येत्या चारपाच दिवस जोरदार पावसाचा इशारा...

16-09-2023

Heavy rain : राज्यात उद्यापासून येत्या चारपाच दिवस जोरदार पावसाचा इशारा...

Heavy rain : राज्यात उद्यापासून येत्या चारपाच दिवस जोरदार पावसाचा इशारा...

  • राज्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. खरीपाची पिकं वाचवण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. 
  • असे असतानाच राज्यात पुढील चार ते पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
  • तर राज्यातील काही भागात अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. 
  • आजही राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
  • येत्या चार चे पाच दिवस राज्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 
  • मान्सून पश्चिमेकडे सरकत आहे. यामुळे उद्यापासून राज्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे.
  • यामध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणच्या काही भागांमध्ये हळूहळू पावसाचं प्रमाण वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. 
  • तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
  • उत्तर महाराष्ट्रात देखील काही भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

source : krishijagran

Heavy rain, havaman andaj, weather forcast, rain update

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading