राज्याच्या काही भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज

30-04-2024

राज्याच्या काही भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज

राज्याच्या काही भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज

राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रात्रही उबदार राहण्याची अपेक्षा आहे.

  • राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण आहे. हवामान विभागाने आज आणि उद्या राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 
  • हवामान विभागाने आज सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला.  
  • ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यातही आज आणि उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील काही भागांत उष्णतेच्या लाटेचा ईशारा दिला.
  • मराठवाडा जिल्ह्यातील बीड आणि हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 
  • नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तर रात्रीची उष्णताही जास्त राहील, असे हवामान विभागाने स्पष्ट केल.
  • भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांचा अंदाज वर्तवला आहे. 
  • पुढील काही दिवस हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

today weather, ajacha havaman andaj, weather forcast today, rain today, tommarow weather

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading