बागायतदार शेतकरी
18-12-2023

चागंला बागायतदार शेतकरी होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा
शेतजमीन सजीव ठेवाल तर टिकाल.
काही संकल्प:
- प्रथम झाडाचे ऐकायला शिका.
- शेतीमध्ये अनुभव हाच गुरू स्थानी माना.
- खर्चात कायम बचत धोरण राबवा
- अनुभव सायन्टिफिक आसु द्या.
- चागंल्या बागायतदाराच्या संपर्कात रहा.
- अनावश्यक खर्चा पासुन दूर रहा.
- स्वत: कामातुन सहभागी व्हा.
- इतरांना चांगला व योग्य सल्ला द्या.
- आपल्या सारखीच इतर शेतकऱ्यांची सर्व अर्थव्यवस्था ह्या पिकावर अवलबुंन आहे हे सदैव लक्षात ठेवा.
- सल्ला घेऊनच प्रत्येक काम करा.
- ह्या पिकात आज घेतलेल्या निर्णायावर उद्याचे भवितव्य अवलंबून आहे, हे विसरू नका.
- ठरवा म्हणजे मिळेल, आणि शोधा म्हणजे सापडेल. या प्रमाणे वागल्यास पुढेच जाल.
- यशस्वी शेतीचे प्रयोग शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बघत चला.
- नैसर्गिक आयुष्यमानच पिकात महत्त्वाचे माना.
- पिकांची रोज चांगली काळजी घ्या.
- निर्णय घ्या आणि तो सार्थ ठरवण्यासाठी प्रयत्न करा.
- पर्यावरण संतुलित शेती करा.
- अनुकरण करू नका.
- भौगोलिक परिस्थिती, भौगोलीक वातावरण व पर्जन्यमान आधारीत शेती केली पाहिजे.
- जल, जमीन व पर्यावरण संतुलीत शेती असली पाहिजे.
🌱अशाच शेतीविषयक माहितीसाठी खालील लिंकवरून कृषी क्रांती व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा👇