PM किसानचा हप्ता जमा झाला नाही तर येथे तक्रार करा

19-11-2023

PM किसानचा हप्ता जमा झाला नाही तर येथे तक्रार करा

PM किसानचा हप्ता जमा झाला नाही तर येथे तक्रार करा

15 नोव्हेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 15 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. त्यासाठी पंतप्रधान मोदींनी 18,000 कोटी रुपयांचा निधी जारी केला आहे. 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर हा हप्ता जमा करण्यात आला आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पैसा जमा झाला नाही ते तक्रार दाखल करु शकतात. त्याचबरोबर 15 व्या हप्ताचे पैसे खात्यात जमा झाले किंवा नाही हे पाहण्यासाठी खाली दिलेली प्रक्रिया पूर्ण करा. 

पैसे खात्यात जमा झाले किंवा नाही हे बघण्यासाठी काय करायचे?

  • सर्वात अगोदर पीएम-किसान पोर्टल ‘https://pmkisan.gov.in’ वर जा.
  • त्यानंतर ‘फार्मर कॉर्नर’ वर जाऊन ‘बेनिफिशिअरी स्टेटस’ वर क्लिक करा.
  • या ठिकाणी आधार क्रमांक, खाते क्रमांक वा मोबाईल क्रमांक टाका.
  • आता खालील कॅप्चा कोड टाकून पुढील प्रक्रिया पूर्ण करावी.
  • त्यानंतर ‘गेट स्टेटस’ वर क्लिक केल्यानंतर पीएम-किसान खात्यात रक्कम जमा झाली की नाही हे कळेल.

तक्रार दाखल करण्यासाठी काय करायचे?

  • सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान वेबसाइटवर जाऊन लॉग इन करावे लागेल.
  • आता "रजिस्टर कंप्लेंट" पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमची तक्रार लिहा.
  • तुमच्या तक्रारीसोबत तुमच्या कागदपत्रांच्या प्रती जोडा
  • तुमच्या तक्रारीत तुमचे नाव, पत्ता, बँक खाते क्रमांक आणि मोबाईल क्रमांक समाविष्ट करा.
  • शेवटी शेतकरी बांधवांनी सबमिट बटणावर क्लिक करावे.

pm kisan, narendra modi, pmksny

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading