शेतीतील पारंपरिक पद्धतींचे पावसाच्या अंदाजावरील महत्त्व
27-05-2024

शेतीतील पारंपरिक पद्धतींचे पावसाच्या अंदाजावरील महत्त्व
पेरणीपूर्व नियोजन करून शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत असतात. यंदा पाऊस कसा होईल?, किती होईल?, याचे आराखडे तयार करतात, परंतु आजही शेतकऱ्यांनी बांधलेले पारंपरिक अंदाज आश्वासक ठरत आहेत.
यंदाच्या पाऊसमानाबाबत हवामान खात्यासह या क्षेत्रातील तज्ज्ञांनीही पावसाचे अंदाज वर्तविले आहेत; पण पाऊसमानाच्या बाबतीत बळीराजाचेही काही पारंपरिक आराखडे असतात. पूर्णपणे नैसर्गिक आचरणावर आधारित असलेले हे अंदाज आजही ग्रामीण भागांत अचूक आणि आश्वासक समजले जातात.
पक्ष्यांनी घरटी झाडाच्या टोकावर बांधली की पाऊस कमी, झाडाच्या मध्यावर बांधली की, पाऊस मध्यम आणि झाडाच्या खालच्या भागात, झाडांच्या ढोलीत बांधली की, पाऊसमान भरपूर होणार, असा एक पारंपरिक अंदाज वर्तविण्यात येतो.
कोकिळा आणि पावशा पक्षी घुमू लागले की, लवकरच पाऊस येणार, बगळ्याची पांढरी पिसे तपकिरी रंगाची दिसू लागली, तर त्यावर्षी पाऊस भरपूर पडणार, असे अनुमान लावले जातात व हे नेहमीच खरे ठरतात.
निसर्ग आणि पाऊस
काही नैसर्गिक घटनांवरूनही त्या-त्या वर्षीच्या पावसाचे अनुमान लावण्यात येतात. होळीच्या दिवशी जर वारा पश्चिम किंवा उत्तर दिशेकडून वाहत असेल तर भरपूर पाऊस. होळीच्या दिवशी पूर्व किंवा दक्षिण दिशेकडून वाहणारा वारा दुष्काळाची चाहूल समजली जाते. समुद्री हालचालीत होणाऱ्या बदलांवरून किनारपट्टी भागातील लोक आणि प्रामुख्याने मच्छीमार मंडळी पावसाचा अचूक अंदाज बांधताना दिसून येतात.
प्राणी आणि पाऊस
उन्हाळ्यात जर गाढवे सतत कान पाडून बसू लागली, तर त्यावर्षी पाऊसमान चांगले. शेळ्ळ्या-मेंढ्या चरत असताना आपला नेहमीचा चारा सोडून तोंडाला येईल ती वनस्पती खात सुटली, तर ते जादा पावसाचे लक्षण, साप आणि मुंग्या वारंवार बीळ आणि वारुळाबाहेर पडताना दिसणे हेही चांगल्या पावसाचे लक्षण मानण्यात येते.
वनस्पती आणि पाऊसमान
- ज्यावर्षी आंब्याचे पीक भरपूर येणार त्यावर्षी पाऊस ओढ देणार त्याचप्रमाणे ज्यावर्षी चिचेच्या झाडावर शेकडो वर्षापासून प्रचलित निसर्ग, प्राणी, पक्षी आणि वनस्पतींच्या दैनंदिन नैसर्गिक आचरणात होणाऱ्या बदलांवरून पावसाचा अंदाज बांधण्याच्या या पद्धती ग्रामीण भागात शेकडो वर्षांपासून प्रचलित आहेत.
- विशेष म्हणजे, पावसाबाबतचे हे पारंपरिक अंदाज किंवा आराखडे सहसा चुकताना दिसत नाहीत. त्यामुळे आजही अनेक शेतकरी या निसर्गचक्रावर विसंबून राहूनच आपल्या शेतीकामांची आखणी करताना दिसतो.
- सध्या विज्ञानामुळे पावसाबाबतचे अचूक अंदाज वर्तविणे सहज शक्य झालेले आहे; पण ग्रामीण भागातील पारंपरिक अंदाजही विश्वसनीय समजण्यात येतात.
- जास्त चिंचा लागतील, त्यावर्षी तुफान पाऊस बरसतो. ज्यावर्षी मोहाच्या झाडाला प्रमाणापेक्षा जादा पाने येतात, त्यावर्षी मुसळधार पाऊस कोसळणार, असा ग्रामीण व आदिवासींचा विश्वसनीय अंदाज असतो.
- उत्तर भारतात बहावा वृक्ष जादा बहरला की, पाऊसही बहरणार आणि बरसणार, ऐन उन्हाळ्यात जर बांबूची पाने हिरवीगार दिसत असतील, तर ती धोक्याची घंटा समजण्यात येते आणि सहसा त्यावर्षी पावसाचे संकेत समजले जातात.
दुष्काळाचे सावट दाटून येते. ऐन उन्हाळ्यात डोंगरावरील गवत जर हिरवाई दाखवू लागले, तर ते तुफानी पावसाचे संकेत समजले जातात.
पावसाची नक्षत्रे आणि त्यांची वाहने - पंचांगानुसार दरवर्षी पावसाच्या नक्षत्रानुसार त्याचे वाहन ठरते व यावरूनही पावसाचा अंदाज वर्तविण्यात येतो.
- नक्षत्राचे वाहन बेडूक, म्हैस किवा हत्ती असेल, तर भरपूर पाऊसः वाहन जर मोर, गाढव, उंदीर असेल, तर मध्यम आणि वाहन जर कोल्हा किंवा मेंढा असेल, तर कमी पाऊस, असे ठोकताळे बांधण्यात येतात.
- वाहन जर घोडा असेल, तर केवळ पर्वतीय भागात पाऊस पडण्याचे संकेत समजले जातात.
- काही नक्षत्रांना तरणा, म्हातारा, सासू, सून अशी नावेही ग्रामीण भागात दिलेली आहेत.
पुनर्वसू नक्षत्र म्हणजे तरणा, पुष्य नक्षत्र म्हणजे म्हातारा, मघा नक्षत्रातील पाऊस म्हणजे सासूचा, तर पूर्वा नक्षत्रातील पाऊस म्हणजे सुनेचा पाऊस, असे ग्रामीण भागात बोलले जाते.