फुले त्रिवेणी गाय बाबत सविस्तर माहिती, जाणून घ्या

03-01-2023

फुले त्रिवेणी गाय बाबत सविस्तर माहिती, जाणून घ्या

फुले त्रिवेणी गाय बाबत सविस्तर माहिती, जाणून घ्या 

मित्रहो, त्रिवेणी या नावावरूनच हि गाय म्हणजे तीन जातींचा संकर आहे. हा संकर कोणता, हे समजावून घेताना- गो-संशोधन आणि विकास प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी इथल्या शास्रद्यांनी २७ वर्षांच्या अथक परिश्रमातून या त्रिवेणी गायींची पैदास केली आहे.

स्थानिक गिर गायींबरोबर जर्सी या विदेशी वळूचा संकर करून ५० टक्के जर्सी आणि ५० टक्के गीर हि गाय गाय तयार करण्यात आली. या संकरीत गीर गायीची प्रजोत्पादन क्षमता, रोग प्रतिकार शक्ती, वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता, दुधातील स्निग्धांशाचे प्रमाण चांगले दिसून आले. फक्त दुध देण्याचे प्रमाण वाढवून मिळावे यासाठी प्रयत्न चालले. संकरीत गीर या निर्मित जातीचा पुन्हा होल्स्तिन-फिजियन आणि २५ टक्के जर्सी, २५ टक्के गीर हि तीन जातींची संकरीत गाय तयार झाली आहे.

या परजातीय संकरीत गायीत सर्व गुण चांगले दिसून आले. गो-पैदास केंद्र आणि काही गोपालकांच्या स्तरावर अनेक वर्षांच्या अनुभवावरून या थ्री जातीय संकरीत गायीत ठळक वैशिट्ये दिसून आलीत. अशी हि

फुले त्रिवेणी गाय :

  1. एका वितात जास्तीत जास्त ६ ते ७ हजार लिटर दुध देते.
  2. या फुले त्रिवेणी गायीच्या दुधात ५.२ टक्के स्निग्धांश (फॅट) जास्तीत
    जास्त मिळाला.
  3. या गायीची रोग प्रतिकार शक्ती चांगलीच आहे.
  4. वातावरणाशी लवकर समरस होण्याची क्षमता.
  5. मृत्यूचे अल्प प्रमाण.
  6. पुढच्या पिढीतही दुग्धोत्पादनाचे प्रमाण टिकून राहते.
  7.  दुधात सातत्य राहते.
  8. भाकड काळ ७० ते ९० दिवस,
  9. रोजचे सरासरी दुधाचे प्रमाण १० ते १२ लिटर (एका गोपालकाच्या त्रिवेणी गायीने एका दिवसात ४.२ फॅटचे ३२ लिटर दुध दिल्याची
    नोंद आहे.
  10. त्रिवेणी गायीच्या दुधातील फॅट ४ ते ५ पर्यंत असल्याची आढळून आले आहे.
  11. या कालवडी १८ ते २० महिने वयाच्या असताना माजावर येतात.
  12. पहिली गर्भधारणा २० ते २२ महिन्यांत होते.
  13. प्रथम विव्याचे वय २८ ते ३० महिने असते.
  14. आणखी वैशिष्टये म्हणजे दोन वितातले अंतर १३ ते १५ महिने असते.
  15. आणि सरासरी दुधाचे एका वितातले प्रमाण ३|| हजार लिटरच्या वर अशी फुले त्रिवेणी गाय मध्यम बांध्याची, ३३५ ते ३५० सें.मी. लांबीची, १५० ते १६० ते सें.मी. उंचीची, ३०० ते ४०० किलो वजनाची असते. 
  16. कपाळ चपटे, नाक फुगीर आणि बाकदार असे असून दुधाल गायीची इतर जी वैशिष्टये असतात ती सर्व वैशिष्टये या गायीत पाहायला मिळतात.

अशा जास्त दुध देण्याची क्षमता असणाऱ्या फुले त्रिवेणी या गायीच्या व्यवस्थापनामध्ये संतुलित आणि सकस चारा, खाद्य, क्षाराचे प्रमाण, अद्ययावत गोठे, पिण्यासाठी भरपूर आणि स्वच्छ शुद्ध पाणी, शारीरिक स्वच्छता, रोग नियंत्रणासाठी लसीकरण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना, हाताळण्याची आणि पाळण्याची पद्धत अशा अनेक व्यवस्थापनाकडे बारकाईने लक्ष दिल्यास फुले त्रिवेणी गाय दुग्ध व्यवसायासाठी इतर जातीपेक्षा निश्चितच श्रेष्ठ आहे.

फुले त्रिवेणी हि संकरीत गाय दुध व्यवसायातल्या क्रांतीत चांगला सहयोग देतेय. हे अनेक गोपालकांच्या अनुभवावरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे गोपालकांनी या जातीच्या गायीचं दुग्ध व्यवसायासाठी पालन करावे. त्यांच्या व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावे. किंबहुना बेरोजगार तरुणांनी फुले त्रिवेणी या गाई किफायतशीर दुग्ध व्यवसायासाठी निश्चितपणे पाळाव्यात.
कृषी प्रवचन, प्रल्हाद यादव

गो संशोधन व विकास प्रकल्प,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
संपर्क - 02426 - 243361

टीप : अशाप्रकारे शेतीविषयक महत्त्वाची माहिती, हवामान अंदाज तसेच दररोजचे ताजे बाजारभाव आपल्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी तुमच्या जिल्ह्याच्या whatsapp ग्रुपला जोडले जा येथे क्लिक करा

Detailed information about Phule Triveni cow

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading