Budget 2024 : अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नेमकं काय?

01-02-2024

Budget 2024 : अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नेमकं काय?

Budget 2024 : अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नेमकं काय?

Interim Budget 2024 : केंद्र सरकारचा शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प आज गुरूवारी (१ फेब्रुवारी) अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला आहे. यावेळी त्यांनी शेतकरी, महिलावर्ग, युवकांसह मध्यमवर्गीयांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. मात्र, या सर्व घोषणा लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केल्या गेलेल्या आहेत, अशी टीका विरोधक करत आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, 'आजचा अर्थसंकल्प हा केवळ अंतरिम अर्थसंकल्प नसून तो सर्वसमावेशक आणि नाविन्यपूर्ण, असल्याचे म्हटले आहे. तसेच, 'हा' अर्थसंकल्प तरुण, गरीब, महिला, शेतकरी या विकसित भारताच्या चार स्तंभांना सशक्त करेल, असेही म्हटले आहे.

तसेच पंतप्रधान म्हणाले, "गरिबांसाठी आम्ही ग्रामीण आणि शहरी भागामध्ये ४ कोटींहून अधिक घरे बांधलेली आहेत. आमचे आणखी २ कोटी नवीन घरे बांधण्याचे लक्ष्य आहे. आमचे उद्दिष्टे हे २ कोटी महिलांना लखपती करण्याचा होता. त्यात आता वाढ करण्यात येणार आहे. 

पुढे पंतप्रधान म्हणाले, "आज या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठीही खूप महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. नॅनो डीएपीचा वापर, प्राण्यांसाठी नवीन योजना, पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेचा विस्तार आणि आत्मनिर्भर भारत तेल बियाणे अभियान हाती घेण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासह खर्च कमी करण्यावरदेखील भर दिली जाईल.

तर 'हा' अर्थसंकल्प भारताच्या तरुण आकांक्षांचे प्रतिबिंब आहे. अर्थसंकल्पात दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. संशोधन आणि नवोपक्रमासाठी १ लाख कोटी रुपयांचा निधी तयार करण्याची घोषणा करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात स्टार्टअप्सना करमाफीची मुदतवाढही जाहीर करण्यात आली आहे. तर वित्तीय तूट नियंत्रणात ठेवत भांडवली खर्चाला ११ लाख ११ हजार १११ कोटी रुपयांचा ऐतिहासिक उच्चांकी निधी देण्यात आलेला आहे.

अर्थसंकल्पावर माजी मुख्यमंत्र्यांची टीका 

दरम्यान या अर्थसंकल्पावर माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील जोरदार टीका केली. त्यांनी, 'हा' अर्थसंकल्प म्हणजे जादूचा प्रयोग असून जसे जादूमधील कबूतर उडून गेल्यावर हाती काही उरत नाही तसाच हा अर्थसंकल्प असल्याचे म्हटले आहे. तर अशा फसव्या अर्थसंकल्पाची आम्हाला गरज तसेच मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असेल असेही त्यांनी म्हटले.

शेतकऱ्यांसह तरुणांची उपेक्षा करणारा अर्थसंकल्प, किसान सभेची टीका

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 चा सादर केला. सरकार अर्थव्यवस्थेची पूर्वीची आणि आताची स्थिती यावर श्वेतपत्रिका काढणार असल्याचे वक्तव्य अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. 2014 मध्ये ज्यावेळी आमच्या सरकारने सत्तेची धुरा सांभाळली त्यावेळी अर्थव्यवस्थेत टप्प्याटप्प्याने सुधारणा करण्याची आणि शासन प्रणाली व्यवस्थित करण्याची आमच्यावर प्रचंड मोठी जबाबदारी होती असे सीतारामन म्हणाल्या. 

लोकांना दिलासा देण्याची, गुंतवणूक आकर्षित करण्याची आणि अतिशय गरजेच्या असलेल्या सुधारणांना पाठबळ देण्याची काळाची गरज होती असे त्या म्हणाल्या. दरम्यान, त्यावेळची अर्थव्यवस्था आणि आताची अर्थव्यवस्था याविषयी बोलताना, अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की, अनेक निर्माण झालेल्या संकटांवर मात करण्यात यश आले आहे. सर्वंकष विकासासह अतिशय उच्च शाश्वत वृद्धीच्या कक्षेत अर्थव्यवस्थेला भक्कमपण स्थापित करण्यात आले आहे. 2014 पर्यंत आपण कुठे होतो आणि आता आपण कुठे आहोत? हे पाहाण्यासाठी आणि त्या वर्षांमध्ये केलेल्या गैरव्यवस्थापनांपासून केवळ धडा घेण्यासाठी सरकार अर्थव्यवस्थेची पूर्वीची स्थिती आणि आताची स्थिती यावर सभागृहात श्वेतपत्रिका सादर करेल, अशी घोषणा यावेळी निर्मला सीतारामन यांनी केली.

budget 2024, interim budget, agriculture budget, agriculture budget 2024

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading