कांदा चाळ अनुदानामध्ये मोठी अपडेट, कांदा चाळ व ट्रॅक्टरसाठी अनुदानात मोठी वाढ…

18-04-2025

कांदा चाळ अनुदानामध्ये मोठी अपडेट, कांदा चाळ व ट्रॅक्टरसाठी अनुदानात मोठी वाढ…

कांदा चाळ अनुदानामध्ये मोठी अपडेट, कांदा चाळ व ट्रॅक्टरसाठी अनुदानात मोठी वाढ…

कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कांदा चाळ, ट्रॅक्टर व पॉवर टिलर यांसारख्या महत्वाच्या उपकरणांवरील अनुदान दरात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. 

तब्बल दहा वर्षांनंतर या योजनांच्या आर्थिक मापदंडांमध्ये सुधारणा करण्यात आली असून, राज्य फलोत्पादन व औषधी मंडळ यांनी या संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरून मिळवा अनेक योजनांचा लाभ:

गेल्या पाच वर्षांपासून महाडीबीटी पोर्टल वरून अर्ज करून शेतकरी विविध योजनांचा लाभ घेत आहेत. आता एका अर्जातून अनेक कृषी अनुदान योजना मिळू शकतात. वाढत्या बाजारभावामुळे साहित्याच्या किंमती वाढल्यामुळे शेतकरी बांधवांकडून अनुदान दर वाढवण्याची मागणी करण्यात येत होती, जी आता पूर्ण झाली आहे.

कांदाचाळ अनुदानात मोठा बदल:

आधीच्या नियमानुसार, २५ टन क्षमतेच्या कांदा चाळीसाठी प्रति टन ७ हजार रुपये खर्च गृहीत धरून ५०% म्हणजे ३५०० रुपये प्रति टन अनुदान दिलं जात होतं.

(टीप: सर्व शेतमालाचे जिल्ह्यानुसार व सर्व बाजार समितीचे बाजारभाव खालील लिंक वर पाहायला मिळतील👇🏻)
https://www.krushikranti.com/bajarbhav

आता सुधारित दरानुसार:

  • २५ टनांपर्यंत: प्रति टन ५,००० रुपये अनुदान
  • २५ ते ५०० टनांपर्यंत: प्रति टन ८,००० रुपये खर्च गृहीत धरून ४,००० रुपये अनुदान
  • ५०० ते १,००० टनांपर्यंत: प्रति टन ६,००० रुपये खर्च गृहीत धरून ३,००० रुपये अनुदान
  • यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. हे कांदा चाळ योजना 2025 साठी फायदेशीर ठरणार आहे.

ट्रॅक्टर व पॉवर टिलरच्या अनुदानात वाढ:

  • अनुसूचित जाती, जमाती व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी:
  • २० BHP (2WD) ट्रॅक्टर: आधीचे ₹1 लाख अनुदान वाढवून ₹2 लाख
  • ८ HP पॉवर टिलर: आधीचे ₹75,000 अनुदान वाढवून ₹1 लाख

इतर सर्व शेतकऱ्यांसाठी:

  • ट्रॅक्टरसाठीचे ₹75,000 अनुदान वाढवून ₹1.60 लाख
  • पॉवर टिलरसाठीचे ₹65,000 अनुदान आता ₹80,000
  • ही सुधारणा सेंद्रिय शेती, यांत्रिकीकरण आणि उत्पन्नवाढीसाठी फारच उपयुक्त ठरेल.

या बदलांचा थेट फायदा कोणाला होणार?

  • कांदा उत्पादक शेतकरी
  • अल्पभूधारक व अनुसूचित जाती-जमातीचे शेतकरी
  • महाडीबीटी योजनेच्या लाभार्थी
  • नवीन शेती तंत्रज्ञान वापरणारे शेतकरी

कांदा अनुदान, कांदा चाळ, ट्रॅक्टर अनुदान, महाडीबीटी योजना, शेतकरी योजना, पॉवर टिलर, कृषी अनुदान, महाडीबीटी अर्ज, government scheme, sarkari anudan, अनुदान योजना, शेती अपडेट, कृषी बातम्या, onion subsidy, chal anudan

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading