खत अनुदान: सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी…!

29-03-2025

खत अनुदान: सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी…!

खत अनुदान: सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी…!

केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली खरीप २०२५ साठी फॉस्फेटिक आणि पोटेंशिक (पी अँड के) खतांवरील अनुदान निश्चित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, खतांच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल आहे.

अनुदानाचा तपशील:

खरीप हंगाम: १ एप्रिल २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५
अंदाजे अर्थसंकल्प: ₹३७,२१६.१५ कोटी
रब्बी हंगामाच्या तुलनेत वाढ: ₹१३,००० कोटी

(टीप: सर्व शेतमालाचे जिल्ह्यानुसार व सर्व बाजार समितीचे बाजारभाव खालील लिंक वर पाहायला मिळतील👇🏻)
https://www.krushikranti.com/bajarbhav

सरकारचा शेतकरी हिताचा दृष्टिकोन

शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किंमतीत खते उपलब्ध करून देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. युरिया, डीएपी, एमओपी आणि सल्फर यासारख्या महत्त्वाच्या खतांच्या आंतरराष्ट्रीय किमतींमध्ये मोठे चढउतार होत असताना, केंद्र सरकारने एनबीएस अनुदान दर निश्चित करत मोठा दिलासा दिला आहे.

शेतकऱ्यांसाठी काय फायदा?

✅ खतांच्या किमती परवडणाऱ्या आणि वाजवी राहतील.
एनपीकेएस खत श्रेणींना सबसिडी मिळेल.
✅ अनुदानाची सुसूत्रता ठेवली जाईल.
खत कंपन्यांना अनुदान मिळून खते स्वस्त मिळतील.

खरीप अनुदान, शेतकरी लाभ, सरकारी योजना, खत दर, एनबीएस सबसिडी, डीएपी अनुदान, परवडणारी खते, शेतकरी विकास, sendriya khat, fertilizer, government scheme, सरकारी योजना

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading