महाडीबीटी योजनेद्वारे शेतकऱ्यांना मिळणार बियाणे अनुदान…
08-02-2025

महाडीबीटी योजनेद्वारे शेतकऱ्यांना मिळणार बियाणे अनुदान…
उन्हाळी हंगाम २०२४-२५ अंतर्गत राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (NMEO-OS) मध्ये भुईमुग व तीळ पिकांसाठी १००% अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरण, शेतकरी प्रशिक्षण व शेतीशाळा राबविण्यात येणार आहेत.
- लाभार्थ्यांची निवड:महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्जाद्वारे लाभार्थ्यांची निवड केली जाईल.
- भुईमुग पिकासाठी: कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, धुळे या ८ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना.
- तीळ पिकासाठी: जळगाव, लातूर, बीड, बुलडाणा या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना.
अर्ज प्रक्रिया:
महाडीबीटी पोर्टलवर बियाणे, औषधे, खते या घटकांतील "प्रमाणित बियाणे वितरण" अंतर्गत अर्ज करावयाचे आहेत.
महत्वाची तारीख:
अर्ज सादर करण्यासाठी अंतिम मुदत: १० फेब्रुवारी, २०२५
आवाहन:
शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की, अधिकाधिक प्रमाणात ऑनलाईन अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्या.