जलतारा योजना, अर्ज करा आणि मिळवा ४,८०० रुपयांचे अनुदान!
16-01-2025

जलतारा योजना, अर्ज करा आणि मिळवा ४,८०० रुपयांचे अनुदान!
सिंचन सुविधा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे, कारण ती अधिक उत्पादन घेण्यास मदत करते. शेतातील विहिरी व कूपनलिकांची पाणीपातळी खालावू नये आणि भूजल पातळी वाढवण्यास मदत होण्यासाठी, राज्य शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ‘जलतारा’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या योजनेद्वारे पाणीपातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांची प्रगती होणार आहे.
सरकारला मोठ्या धरणांचे बांधकाम करणे शक्य नसल्यामुळे ‘मागेल त्याला विहीर’ हे धोरण सुरू करण्यात आले आहे. विहिरींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जमिनीतील पाण्याचा उपसा केला जात असल्यामुळे भूजल पातळी घटत आहे.
ही स्थिती सुधारण्यासाठी जमिनीतील पाण्याचा उपसा कमी करून पाण्याचा पुनर्भरण आवश्यक आहे. यासाठी शासनाने जलतारा योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे, ज्यामुळे पाण्याची पातळी वाढून शेतकऱ्यांना अधिक लाभ होईल.
जलतारा योजनेचे फायदे:
भूजल पातळी वाढ: जलतारा योजनेमुळे जमिनीतील पाण्याचा पुनर्भरण होईल, ज्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.
सिंचनासाठी अधिक पाणी उपलब्धता: भूजल पातळी सुधारल्याने शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होईल.
शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण: शेतीतील उत्पादन वाढल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.