पपईचे औषधी गुणधर्म आणि उपयोग...
23-07-2024
पपईचे औषधी गुणधर्म आणि उपयोग...
भारतामध्ये पपईची लागवड महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम, बिहार व पश्चिम बंगाल आदी राज्यांत मोठ्या प्रमाणात होते. महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदुरबार, वर्धा, अमरावती, जालना, नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर व सातारा या जिल्ह्यांत पपई घेतली जाते.
पपई हे कमी कालावधीत, कमी खर्चात चांगले उत्पादन देणारे पीक असल्यामुळे अन्य फळपिकांत पपई हे आंतरपीक म्हणून घेतले जाते. पपईचा औषधी व अन्नप्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
पपईतिल औषधी गुणधर्म:
• पपई फळात अ जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असून दररोजच्या आहारात या फळाच समावेश आवश्यक आहे.
• या फळात थायामिन 40 मिलिग्रॅम, रायबोफ्लॅव्हीन 250 मिलिग्रॅम व जीवनसत्त्व क 46 मिलिग्रॅम प्रति 100 ग्रॅम गरात आढळते.
• पपईचे फळ बद्धकोष्टता, अपचन, मूळव्याध इत्यादी विकारांवर गुणकारी आहे. म्हणूनच म्हणतात, ‘पपईची फोड, पळवे पोटदुखीची खोड!’
• पपईच्या कच्च्या फळापासून पेपेन काढले जाते.
• याचा औषधी आणि अन्नप्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
• पेपेनचा उपयोग मद्यनिर्मिती उद्योगात, सौंदर्य प्रसाधने आणि अपचनाच्या विकारांवरील औषधे बनविण्यासाठी केला जातो.
• पपई खाल्याने डोकेदुखी, अनिद्रा, बद्धकोष्ठता हे आजार ही दूर होतात.