Cyclone Michaung : मिचाँग चक्रीवादळ आज दुपारी किनाऱ्यावर धडकणार

05-12-2023

Cyclone Michaung : मिचाँग चक्रीवादळ आज दुपारी किनाऱ्यावर धडकणार

Cyclone Michaung : आज दुपारी मिचाँग चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकणार

Cyclone Update : नैऋत्य बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. ३) पहाटे पासून मिचाँग चक्रीवादळ सकाळपासून गर्जना करू लागले आहे.

बंगालच्या उपसागरात मिचाँग चक्रीवादळाची तीव्रता वाढत आहे. आज (ता. ५) हे तीव्र चक्रीवादळ दक्षिण आंध्र प्रदेश आणि उत्तर तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. ते दुपारपर्यंत आंध्र प्रदेशातील नेल्लोर आणि मचिलीपटनम दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. या प्रणालीमुळे विदर्भात ढगाळ हवामान आणि पावसाची शक्यता आहे.

नैऋत्य बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. ३) पहाटे पासून ‘मिगजौम’ चक्रीवादळ घोंघावू लागले आहे. चक्रीवादळाचे केंद्र चेन्नईच्या पूर्वेला 90 किमी, नेल्लोरच्या आग्नेयेला 170 किमी, पुडुचेरीच्या ईशान्येला 200 किमी, बपतलाच्या आग्नेयेला 300 किमी आणि मछलीपट्टनमच्या आग्नेयेला 530 किमी अंतरावर होते. ही आजची व्यवस्था आहे. आंध्र प्रदेशातील नेल्लोर आणि मचिलीपटनम दरम्यान बापटला जवळील किनाऱ्यावर दुपारपर्यंत धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे.

90 ते 110 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, रायलसीमा आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. किनारपट्टीवर एक मीटर उंचीपर्यंत जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुरामुळे पिके, रस्ते, पूल, कालवे आणि घरे उद्ध्वस्त झाली आहेत. जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे सखल भागात भूस्खलन आणि पूर येण्याची शक्यता आहे.

Cyclone Michaung, cyclone, rain update, weather update, havaman andaj

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading