Milk Rate : दूध दरवाढ धोरणाचा दूध उत्पादकांना खरंच फायदा होतोय का?

07-08-2023

Milk Rate : दूध दरवाढ धोरणाचा दूध उत्पादकांना खरंच फायदा होतोय का?

Milk Rate : दूध दरवाढ धोरणाचा दूध उत्पादकांना खरंच फायदा होतोय का?

राज्य सरकारनं दूध दरवाढीचे नवे धोरण राज्यात लागू केले. नवीन धोरणानुसार दूधाला ३४ रुपये प्रतिलीटरचा दर जाहीर केला. परंतु दूध दरवाढीमुळे दूध उत्पादकांचाच तोटा होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने नवीन दूध दर धोरणात बदल करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष  अनिल घनवट यांनी केली आहे. यासंदर्भात राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण पाटील यांना निवेदन केले आहे.

Milk Price : राज्य सरकारने नवीन धोरण लागू करून दूध दरवाढ केली. नव्या धोरणानुसार ३.५ फॅट आणि ८.५ सॉलिड नॉट फॅट (एसएनएफ) असलेल्या दुधाला ३२ रुपयांऐवजी ३४ रुपये दर जाहीर केला. परंतु दोन रुपयांची वाढ दिसत असली तरी प्रत्यक्षात मात्र दूध उत्पादकांना आधीच्या दरापेक्षा कमी दर मिळत असल्याची दूध उत्पादकांची तक्रार आहे.

पूर्वीच्या धोरणात ३२ रुपये दर असताना ८.५ ऐवजी ८.४ असेल तर एक पॉइंट कमी असून ३० पैसे कमी मिळत होते. परंतु आता मात्र राज्य सरकारच्या नव्या दूध तक्त्यानुसार, ३४ रुपये प्रतिलीटरला ८.४ असले तर थेट एक रुपया कमीच मिळतोय.

दूध केंद्राकडून दूध उत्पादकांना या तक्त्यानुसार दर दिले जात आहेत. त्यामुळे दुधाचा पॉइटला एक रुपया कमी होत आहे. परिणामी दूध उत्पादकांना ३२ रुपये दर असताना जो दर मिळत होता त्याहीपेक्षा आता दर कमी मिळतोय, अशी तक्रार दूध उत्पादकांची केल्याचं घनवट यांनी निवेदनात म्हंटलं आहे.

खाजगी दूध संघ नवीन धोरणाचा गैर फायदा घेत असल्याची तक्रारी शेतकरी करत आहेत. दुधाचे फॅट मापक मशिनचे कालिब्रेशन तहसीलदारांनं करायचे असते ते केले जात नाही. तसेच वजनातसुद्धा चोरी होत असल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत, या बाबीही घनवट यांनी निवदेनात निदर्शनास आणून दिल्या आहेत.  

दूध उत्पादकांच्या तक्रारी लक्षात घेऊन राज्यात नवीन दरवाढ धोरणात सुधारणा करावी. तसेच फॅट चोरी व काटामारी करणाऱ्या दूध संघावर अंकुश ठेवण्यासाठी भरारी पथकं नेमवावीत, अशी मागणी अनिल घनवट यांनी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.

source : agrowon

Milk Rate, Milk Price, milk production

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading