मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना :- ठिबक सिंचन

09-05-2023

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना :- ठिबक सिंचन

राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पीक 

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना :- ठिबक सिंचन

उद्देश

  1. सिंचनाखालील लागवडीयोग्य क्षेत्र वाढविणे.
  2. उपलब्ध पाण्याची कार्यक्षमता वाढविणे. 
  3. पिकांच्या उत्पादनात व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे.

पात्र लाभार्थी

सर्व खातेदार शेतकरी

(यापूर्वी त्याच क्षेत्रावर मागील ७ वर्षात लाभ घेतलेला नसावा)

आवश्यक कागदपत्रे

  1. ७/१२, ८अ चा उतारा 
  2. संवर्ग प्रमाणपत्र (एससी, एसटी. साठी)
  3. पाण्याचा स्त्रोत उपलब्ध प्रमाणपत्र

खर्च मर्यादा :

  अ.क्र.   

 

  अंतर  

  (mxm)  

  क्षेत्र

  0.2 ha   

 

  0.4 ha  

 

  1 ha  

०१   १.२ x ०.६    ३१४३६    ५७२४१    १२७५०१  
०२   १.८ x ०.६    २४५६९     ४२९९२     ९१५६०   
०३   १.५ X १.५    २८१०६     ४६९९५     ९७२५४   
०४   ३ x ३    १५७९२     २६१९०     ४७७५१   

 

अनुदान

अल्प व अत्यल्प भूधारक शेतकन्यांना खर्च मर्यादेच्या ८०% व इतर शेतकऱ्यांना खर्च मर्यादाच्या ७५% अनुदान देय आहे.

प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजनेतून ५५% / ४५% व उर्वरीत पुरक अनुदान मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना २५%/३०% देय. 

अर्ज कुठे करायचा?

  • मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू आहेत. 
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. 
  • अर्ज करण्यासाठीचे ऑनलाईन संकेतस्थळ : mahadbtmahait.gov.in
  • mahadbtmahait.gov.in या वेबसाइट वर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता 
  • अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क करावा. 

source : krushi vibhag maharashtra

 

krushi yojana, sarkari yojana, Tibak shichan yojna

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading