Mustard Cultivation; मोहरी लागवड तंत्रज्ञान व पद्धती.

28-10-2023

Mustard Cultivation; मोहरी लागवड तंत्रज्ञान व पद्धती.

Mustard Cultivation; मोहरी लागवड तंत्रज्ञान व पद्धती 

महाराष्ट्रातील रब्बी हंगामातील (Rabbi Season) १० ते ३० अंश सेल्सिअस (ऑक्टोबर शेवटचा आठवडा ते फेब्रुवारी) तापमान मोहरी पिकास (Mustard Crop) पोषक आहे. मोहरी हे गहू, हरभरा आणि जवस या पिकांमध्ये आंतर किंवा (Intercrop) मिश्र पीक (Mixed Crop) म्हणून घेण्यात येते.

मोहरी बियांमध्ये ३२ ते ४० तेलाचे प्रमाण असून हे मानवी शरीरास गुणकारी आहे. मोहरीच्या हिरव्या कोवळ्या पानाची भाजी आरोग्याला उत्तम असते. मोहरीमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशिअम, जीवनसत्त्व अ आणि जीवनसत्त्व क मोठ्या प्रमाणात आहे. मोहरीच्या ढेपेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असून दुधाळ जनावरांसाठी उपयुक्त आहेत. या पिकाला कमी ओलित (२ ते ३ पाण्याच्या पाळ्या) लागते. गावठी तसेच रानटी जनावरे या पिकाला सहसा खात नाहीत. तसेच रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात असतो.

पूर्व विदर्भात भात पिकानंतर कमी कालावधीत तसेच कमी उत्पादन खर्चात येणारे मोहरी हे एक उपयुक्त पीक आहे. भात पीक निघाल्यानंतर पूर्व विदर्भातील शेतकरी रब्बी पिके पारंपरिक पद्धतीने घेतात. त्यामुळे शेतात रोपांची योग्य संख्या रहात नाही. कुठे दाट तर कुठे विरळ होते, त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते. मोहरीची पेरणी करताना शेतकरी अजूनही स्थानिक जातींचा वापर करतात. एकरी २ ते ३ किलो बियाणे वापरतात, अयोग्य व्यवस्थापनामुळे पीक उत्पादनात घट होते. हे लक्षात घेऊन सुधारित तंत्राने मोहरी लागवडीचे नियोजन करावे.

बियाणे तीन ते चार सें.मी. खोल ओलित पडेल अशा बेताने पेरावे. बियाणे जास्त खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी. 

पेरणीपूर्वी एक ओलिताची पाळी देऊन वाफसा येताच पेरणी करावी. पाणी देण्यासाठी सारे काढावेत. पेरणीनंतर १५ दिवसांनी विरळणी करावी. 

निश्‍चित ओलिताची सोय असल्यास हेक्‍टरी ५० किलो नत्र, ४० किलो स्फुरदाची मात्रा द्यावी. त्यापैकी पेरणीच्या वेळी अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद व उरलेली अर्धी नत्राची मात्रा पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी पहिल्या ओलिताच्या वेळी द्यावी. 

निश्‍चित ओलिताची सोय असल्यास उगवणीनंतर २५ दिवसांच्या अंतराने ओलिताच्या तीन पाळ्या द्याव्यात. दोनच ओलिताच्या पाळ्या देणे शक्‍य असल्यास पेरणीनंतर एक महिन्याने पहिले व पीक फुलांवर असताना दुसरे ओलित करावे. 

मोहरी लागवड, तंत्रज्ञान व पद्धती, mustard cultivation, मोहरीIntercrop, सरसो, Mustard Crop)

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading