पंतप्रधान किसान योजना: वंचित शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी, अर्ज १५ एप्रिलपासून सुरू…
06-04-2025

पंतप्रधान किसान योजना: वंचित शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी, अर्ज १५ एप्रिलपासून सुरू…
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे, ज्याद्वारे पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 ची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत आतापर्यंत १९ हप्ते वितरित झाले असून, एकूण ₹38,000 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
वंचित शेतकऱ्यांना दिलासा:
कागदपत्रातील त्रुटी, मालकी हक्कात बदल, बँक खात्यातील चुका किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे काही शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहिले होते. आता सरकारने या शेतकऱ्यांना पुन्हा एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. १५ एप्रिलपासून नव्याने नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे.
अर्ज प्रक्रिया कशी करावी?
- शेतकऱ्यांनी खालील प्रमाणे अर्ज करावा:
- अधिकृत संकेतस्थळ: https://pmkisan.gov.in
- ‘नवीन शेतकरी’ या पर्यायावर क्लिक करा
- राज्य, आधार क्रमांक, मोबाईल नंबर टाका
- आलेला OTP टाका
- शेतकऱ्याची वैयक्तिक माहिती, जमिनीची माहिती व बँक तपशील भरा
- अर्ज सबमिट करा
टीप: तलाठी, कृषी सहायक किंवा कॉमन सेवा केंद्रामार्फत ऑफलाइन अर्ज देखील करता येतील.
पात्रतेचे निकष:
- अर्जदार लहान किंवा सीमांत शेतकरी असावा
- नाव राज्य किंवा केंद्र शासनाच्या जमिनीच्या नोंदीमध्ये असावे
- आधार कार्ड, बँक खाते व मोबाईल क्रमांक योजना प्रणालीशी जोडलेले असावेत
मागील हप्त्यांचा लाभ मिळणार का?
सध्या शासनाकडून मागील हप्त्यांचा लाभ मिळेल की नाही याबाबत स्पष्टता देण्यात आलेली नाही. मात्र, नोंदणी करून शेतकऱ्यांनी पुढील हप्ते मिळवण्याची संधी मिळवू शकतात.