Maharashtra Rain : राज्यातील आज सात जिल्ह्यांना येलो अलर्ट; महाराष्ट्रातील काही भागात आज आणि उद्या पावसाचा अंदाज.
08-11-2023

Maharashtra Rain : राज्यातील आज सात जिल्ह्यांना येलो अलर्ट; महाराष्ट्रातील काही भागात आज आणि उद्या पावसाचा अंदाज.
महाराष्ट्रात राज्यात अनेक ठिकाणी आज काही वेळ ढगाळ वातावरण होते. तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या. हवामान विभागाने दोन दिवस काही भागात पावसाचा अंदाज दिला.
हवामान विभागाने आज राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट दिला. कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज दिला. तर यावेळी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही आहे.
तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांनाही काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर पुणे, धाराशिव आणि ठाणे जिल्ह्यात विजांसह काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.
उद्याही राज्यातील पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला. सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर पुणे, रायगड आणि सोलापूर जिल्ह्यात विजांसह हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.